राज्य सरकार राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत प्रती थेंब अधिक पीक योजनेतील सर्वसाधारण प्रति थेंब अधिक पीक योजनेतील सर्व साधारण प्रवर्गाचा 152 कोटी 14 कोटी रुपयांचा निधी कृषी आयुक्ताकडे वितरणासाठी मंजूर केला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना 2024-2025 मधील ठिबक आणि तुषार सिंचनाचा निधी मिळण्याचा मार्गमोकळा झाला आहे
राज्य सरकारने या संदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी 21 तारखेला प्रसिद्ध केला आहे प्रति थेंब अधिक पीक या योजनेतून सूक्ष्म सिंचन घटकातील शेतकऱ्यांना ठिबक आणि तुषार सिंचनासाठी लाभ दिला जातो त्यासाठी केंद्र सरकार 60 टक्के आणि राज्य सरकार 40 टक्के इतका हिस्सा देतो त्यानुसार 16 मे 2024 शासन निर्णयामुळे सूक्ष्म सिंचन घटकासाठी 667 कोटी 50 लाख रुपयांचा निधी दिला व प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती
योजनेसाठी केंद्र सरकारच्या 407 कोटी रुपयांचा हिस्सा होता तर राज्य सरकारचा 271 कोटी ते 33 लाख रुपयांचा हिस्सा होता यामधील 152 कोटी 14 लाख रुपयांचा निधी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकऱ्याचं सूक्ष्म सिंचन अनुदान मागील वर्षभरापासून प्रलंबित आहे परंतु शेतकऱ्यांनी सिंचन संच खरेदी करूनही लाभ वेळेवर न मिळाल्याने कोंडी झालेली आहे तसेच मागील दोन वर्षाचे अनुदान विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राप्त झाले नसल्याचे शेतकरी सांगतात
त्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन आणि मोर्चा काढून सरकारचा या प्रश्नाकडे लक्ष वेधले दरम्यान केंद्र सरकार विविध योजना चा निधी राज्य सरकारला वेळेवर देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा सिंचन अनुदान प्रलंबित असल्याची कबुली अलीकडेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली होती यावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी उमटली होती त्यानंतर राज्य सरकारने आता योजनेतील निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे कृषी आयुक्ता कडून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लाभ ( डीबीटी ) मार्फत जमा करण्यात येणार आहे