देशभरातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आता सोयाबीनच्या दारातील घसरणीचा मोठा फटका बसला आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सर्व प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये सोयाबीनचे दर 15 टक्क्यांपर्यंत कोसळले आहेत सप्टेंबर महिना घाऊक बाजारात सोयाबीनचे दर मागील वर्षाच्या तुलनेत सरासरी 11.5 टक्क्यांनी घसरले आहेत विशेष म्हणजे यंदा केंद्र सरकारने हमीभाव वाढलेला असताना आणि खरीप हंगामात सोयाबीनच्या लागवड क्षेत्र घटुनही बाजारात दर टिकून शकले नाही कृषी उत्पन्न बाजार समिती च्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2025 मध्ये सोयाबीनचा सरासरी घाऊक भाव 4 हजार 617 प्रतिक्विंटल राहील जो सप्टेंबर 2024 मधील 5,220 प्रतिक्विंटल च्या तुलनेत खूपच कमी आहे
कृषी मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार खरीप 2025 मध्यप्रदेशात 10. 50 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पीक घेतले गेले जे गतवर्षीच्या याच कालावधीतील 11. 07 लाख हेक्टर पेक्षा सुमारे 5.15 टक्क्यांनी कमी आहे केंद्र सरकारने 2025-26 साठी सोयाबीनचा हमीभाव 436 रुपयांनी वाढवून 5 हजार 328 प्रतिक्विंटल केला असला तरी प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये मात्र सोयाबीनचे भाव हमीभाव पेक्षा बरेच कमी आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये सप्टेंबर महिन्यात सोयाबीनचे दर अनुक्रमे 4,080, 4,170 4 हजार 182 आणि 4, 028 प्रति क्विंटल इतके नोंदवले गेले आहे हे दर ऑगस्ट च्या तुलनेत 7 ते 15 टक्क्यांनी कमी आहेत वार्षिक तुलनेत 3 ते 7 टक्क्यांनी कमी आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहेच