केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी शेतकऱ्यांना पारंपारिक पिकांवर मर्यादित न राहता फुले, फळे तसेच सेंद्रिय शेतीची सारख्या पर्यायी पिकाकडे वळण्याचे आवाहन केले असून बियाणे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे ग्लोबल विकास या सामाजिक कार्यकर्ते मयंक गांधी यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्यावतीने परळी वैजनाथ जि बीड तालुक्यातील शिरोळा येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात चव्हाण बोलत होते
या मेळाव्यात मराठवाड्यासह शेजारच्या जिल्ह्यांमधील हजारो शेतकरी उपस्थित होते श्री शिवराज सिंह म्हणाले सोयाबीन तसेच कापसा सोबतच शेतकऱ्यांनी फुल शेती फळबाग शेती सेंद्रिय शेती अंगीकार करावी यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात विविधता तसेच शौर्य येईल नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या मुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहेत
या मदत देण्यात केंद्र व राज्य सरकार कोणतीही कसर सोडणार नाही केंद्रीय कृषिमंत्री यांनी पुढे सांगितले की सरकारी संस्थांना कृषीमाल थेट मोठ्या बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्यास सक्षम केले जाईल यामुळे तसेच शहरी बाजारपेठेमधील दरातील तफावत कमी करता येईल ग्लोबल विकास राबवलेले यशस्वी शेती मॉडेल देशभरात लागू करण्यात येईल आणि या संस्थेशी भागीदारी केल्यास शेतकऱ्यांचे भाग्य बदलण्यास मदत होईल मेळाव्याला संबोधित करताना मयंक गांधी म्हणाले की परळीवैजनाथ बाबत अनेक अनेक गैरसमज होतात पण तिथले लोक मेहनती आणि प्रामाणिक आहेत आता आपल्याला फळे व फुलशेती वळणे गरजेचे आहे
कार्यक्रमादरम्यान चव्हाण यांनी व्यासपीठावरून खाली उतरून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा उत्साह दिसून आला अनेक शेतकऱ्यांनी मी शेतकरी मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार या घोषणेची पांढरी टोपी प्रधान केली तीच टोपी चव्हाण यांनी देखील घातली मेळाव्याच्या ठिकाणी ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, शेती उपकरणे आणि कृषी निविष्ठांची प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते त्याला सकाळपासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी भेट दिली





