SBI Shishu Mudra Loan Yojana 2024 (शिशु मुद्रा लोन) असा करा ऑनलाईन अर्ज

भारत सरकार आणि सरकारी बँकेद्वारे संयुक्तपणे एसबीआय शिशु मुद्रा कर्ज योजना ही छोट्या व्यवसायिकांना फायदेशीर ठरणारी अशी योजना आहे चला तर मग शिशु मुद्रा लोन योजनेबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घेऊया

सध्या जर तुम्ही एसबीआय शिशु मुद्रा कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छित असाल तर या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊया,

SBI शिशु मुद्रा लोन योजना काय आहे?

8 एप्रिल 2015 मध्ये भारत सरकारने बँक मध्ये एक नवीन प्रकारची योजना सुरू केली आहे ज्यामध्ये प्रत्येक छोट्या व्यवसायिकाला त्याच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आर्थिक मदत मिळू शकेल, भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरुवात केली असून एसबीआय शिशु मुद्रा कर्ज योजना असे या योजनेचे नाव आहे.

या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक छोट्या व्यापाऱ्याला या योजनेच्या माध्यमातून 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. याशिवाय किशोर लोन घेतल्यास तुम्हाला 50,000 ते 5,00,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते, आणि युथ लोन घेतल्यास 5,00,000 ते 10,00,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.

या तिन्ही कर्जातून पैसे मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारची कोणतीही मौल्यवान वस्तू तारण म्हणून जमा करण्याची काही गरज नाही जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला या कर्जाचे पैसे मिळू शकतील.

SBI शिशु मुद्रा लोन योजनेचे उद्देश्य

सध्या भारतात विविध प्रकारच्या योजना प्रचलित आहेत इतर योजनेप्रमाणेच एसबीआय शिशु मुद्रा लोन योजनेची ही काही उद्दिष्ट आहेत ती खालील प्रमाणे-

• SBI शिशु मुद्रा लोन योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश असा की भारतातील प्रत्येक छोट्या व्यवसायिकाचा अधिक विस्तार करणे हा आहे.

• प्रत्येक छोटा व्यवसाय सक्षम आणि स्वावलंबी व्हावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

• या योजनेच्या माध्यमातून व्यापारी आपल्या व्यवसायाचा विस्तार करणार असल्याने भारतातील उद्योगांचा विकास करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

SBI शिशु मुद्रा लोन योजनेची पात्रता

जर एसबीआय शिशु मुद्रा लोन साठी अर्ज करू इच्छित असाल तर तुमची पात्रता असणे आवश्यक आहे.

  1. एसबीआय शिशु मुद्रा लोन योजना लागू करण्यासाठी आवेदन करता हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  2. या योजनेअंतर्गत ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे ते पात्र असतील.
  3. अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे.
  4. अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे जे गेल्या तीन वर्षापासून सक्रिय आहे.

SBI शिशु मुद्रा कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

तुम्हाला SBI शिशु मुद्रा कर्ज योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास अर्ज करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • पॅन कार्ड
  • आयकर रिटर्न प्रमाणपत्रे
  • बँक चेक
  • व्यवहारी यादी
  • उत्पन्नाचा पुरावा
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

SBI शिशु मुद्रा कर्ज योजना ऑनलाइन अर्ज

SBI शिशु मुद्रा कर्ज योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा असल्यास तो पुढील प्रमाणे करावा

स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला https://emudra.bank.sbi:8044/emudra ही लिंक टाकून अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

स्टेप 2 : अधिकृत वेबसाईटच्या होम पेजला भेट दिल्यानंतर प्रोसीड फॉर ई-मुद्रा पर्यायावर क्लिक करावे लागेल.

स्टेप 3 : त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर किंवा कम्प्युटर्स स्किनवर एक नोटिफिकेशन दिसेल तिथे अर्ज कसा करायचा याची माहिती पाहिल्यानंतर तुम्हाला ओके पर्यायावर क्लिक करावे लागेल .

स्टेप 4 : पुढील पेजवर आल्यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडावी लागेल आणि बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकावा लागेल त्यानंतर कॅपच्या कोड भरल्यानंतर तुम्हाला व्हेरिफाय ऑप्शन वर क्लिक करून ओटीपी द्वारे मोबाईल नंबरची पडताळणी करावी लागेल नंतर तुम्हाला तुमचा बँक खाते क्रमांक आणि तुम्हाला किती पैसे घ्यायचे आहेत ते टाकल्यानंतर तुम्हाला पुढे जाण्याच्या पर्यावर क्लिक करावे लागेल.

स्टेप 5 : पुढील पेजवर आल्यानंतर आता तुम्हाला तुमचा व्यवसाय पत्ता आणि व्यवसाय विक्री खाते तपशील योग्यरीत्या भरून नंतर तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.

स्टेप 6 : सबमिट पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर सामग्रीची सारणी दिसते ते तुम्हाला SBI ग्रीटिंग्स दिसेल, तेथे तुम्ही अर्ज केलेल्या कर्जाच्या रकमेची सर्व माहिती पाहू शकता त्यानंतर तुम्हाला नियम आणि अटी पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि पुढे जाण्यासाठी eSign पर्यायावर क्लिक करावे लागेल.

स्टेप 7 : आता तुम्हाला I agree पर्यायावर क्लिक करावे लागेल.

स्टेप 8 : पुढील पेज वर आल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करावे लागेल आणि ओटीपी पर्यायाद्वारे eSign वर क्लिक करावे लागेल.

स्टेप 9 : पुढील पेजवर आल्यानंतर तुम्हाला सहमत पर्यायावर क्लिक करावे लागेल आधार क्रमांक पुन्हा प्रविष्ट करा आणि ओटीपी पाठवा या पर्यायावर क्लिक करा.

स्टेप 10 : आधार क्रमांकाची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला पुढील पेजवर जाऊन proceed या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

स्टेप 11 : proceed या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची सर्व माहिती पाहू शकता आणि तुम्ही अर्जाचा फॉर्म डाउनलोड किंवा प्रिंट देखील करू शकता.

स्टेप 12 : proceed या पर्यायावर पुन्हा क्लिक करा आता थोडा वेळ थांबल्यानंतर तुम्हाला अभिनंदन दिसेल त्याखाली प्रिंट ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही कर्जामध्ये किती पैसे मिळाले आणि तुम्हाला ते कर्ज कधी परत करावे लागेल याची माहिती प्रिंट करू शकता.

Leave a Comment