रब्बी पिक विमा अर्ज सुरू शेतकऱ्यांना किती प्रेमियम भरावा लागणार सोप्या भाषेत संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे रब्बी हंगाम 2025-26 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY) ऑनलाईन नोंदणी अधिकृतरित्या सुरुवात झाली आहे नैसर्गिक आपत्ती पावसाच्या अनियमित प्रमाण तसेच दुष्काळ गारपीट किंवा अचानक कीड रोगामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानी पासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अधिकृत पोर्टल pmfby. gov.in उपलब्ध करून दिले आहे प्रत्येक शेतकरी घरबसल्या अर्ज करू शकतो किंवा कृषी विभागाकडून अंतिम तारखा अर्जाची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती मार्गदर्शन जारी करण्यात आले आहे

प्रधानमंत्री पिक विमा योजना का महत्वाची?

पिक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या पिकाचे आर्थिक संरक्षण करणारी सर्वात मोठी योजना आहे अचानक होणाऱ्या नैसर्गिक बदलामुळे पिकांचे नुकसान होते अशा वेळी शेतकऱ्यांना मिळणारी भरपाई ही या योजनेत शक्य होते

या योजनेत शेतकऱ्यांना –

  1. दुष्काळ
  2. अतिवृष्टी
  3. पूर
  4. गारपीट
  5. चक्रवादळ
  6. रोग व कीड

या मुळे झालेले नुकसान कव्हरमध्ये येते

रब्बी हंगामात पुणे, सोलापूर आणि अहमदनगर (अहिल्यानगर) या जिल्ह्यांमध्ये योजना भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत अमलात आणली जाते

रब्बी पिकासाठी अंतिम मुदत?

या हंगामात पिकानुसार अर्जाच्या अंतिम तारखा खालील प्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत

पीक अंतिम तारीख
ज्वारी 30 नोव्हेंबर 2025
गहू, हरभरा, कांदा 15 डिसेंबर 2025
उन्हाळी 31 मार्च 2026

शेतकऱ्यांनी वेळेआधी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा पिकावर संरक्षण मिळणार नाही

अर्ज कसा करायचा ऑनलाइन (online application process)

या योजनेचा अर्ज संपूर्णपणे ऑनलाईन स्वीकारला जातो त्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पायऱ्या पाळावे

  • सर्वात प्रथम AgriStack Farmer ID नोंदणी करा पिक विम्यासाठी ॲग्रीस्टॅग नोंदणी अनिवार्य
  • अधिकृत पोर्टलवर pmfby. gov. in जा मोबाईल नंबर आणि आधार OTP Verification करा
  • वैयक्तिक व शेतीची माहिती भरा आणि संरक्षण (ई पीक पाहणी) निवडा
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

प्रीमियर भरा आणि अर्ज सबमिट करा

अर्ज सबमिट का झाल्यानंतर Application status आल्यावर पर्यायातून तुम्हाला अर्ज तुमचा अर्ज मंजूर प्रलंबित आहे की नाही हे पाहता येते

अर्ज साठी आवश्यक कागदपत्रे (Yojana Documents)

नोंदणी करताना खालील कागदपत्रे अनिवार्य आहेत

  • आधार कार्ड
  • शेतकरी ओळखपत्र
  • बँक पासबुक
  • सातबारा उतारा
  • भाडेकरू शेतकऱ्यांसाठी भाडेकरार
  • ई- पिक पाहणीचा पुरावा

कागदपत्रे स्पष्ट आणि वाचता यावेत

शेतकऱ्यांना किती प्रेमियम भरावा लागणार

शेतकऱ्यांना फक्त ठराविक प्रीमियम भरावा लागतो कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागत नाही सीएससी (CSC) केंद्राना लागणारे 40 शुल्कही विमा कंपनी देते

उदाहरणार्थ पुणे जिल्हा (2025-26) साठी प्रेमियम

पिक विमा कव्हर शेतकरी प्रेमियम

  • गहू (सिंचित) ₹45 हजार ₹225
  • हरभरा 36 हजार 90

प्रत्येक पिकानुसार दर बदलू शकतात म्हणूनच अर्ज करताना पोर्टलवर अद्यावत दर पहाणे महत्त्वाचे आहे

फसव्या दाव्यावर कारवाई

कृषी विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की फसव्या दावा सिद्ध झाल्यास शेतकऱ्यांना पाच वर्षे सर्व सरकारी योजनेपासून वंचित ठेवले जाईल चुकीची कागदपत्रे दिसल्यास तात्काळ कारवाई केली जाईल म्हणून अर्ज करताना सर्व माहिती अचूक देणे बंधनकारक ठरेल

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे मार्गदर्शन

अंतिम तारखे पूर्वी अर्ज पूर्ण करा ई पीक पाहणी, वेळेवर अपडेट ठेवा, कागदपत्रे स्कॅन करून स्पष्ट अपलोड करा, विमा कव्हर व प्रेमियम आपल्या तालुक्या नुसार तपासा, अर्ज सबमिट झाल्यानंतर रिसीट जतन करा

मदतीसाठी संपर्क

  • हेल्पलाइन 14447
  • स्थानिक कृषी कार्यालय
  • कृषी विभाग संकेतस्थळ Krishi.maharashtra.gov.in

निष्कर्ष : शेती पिकासाठी शेतकऱ्यांनी पीक योजना घेणे अत्यंत आवश्यक आहे पाऊस दुष्काळ किंवा नैसर्गिक संकटाचे प्रमाण वाढत असताना या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो कमी प्रीमियम मध्ये मोठे विमा कव्हर मिळते त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मदतती पूर्वी अर्ज पूर्ण करणे अत्यंत फायदेशीर ठरते

Leave a Comment