शेतकरी बांधवांनो पीक विमा योजनेबाबत केंद्र शासनाने एक अतिशय मोठा दिलासादायक निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे 18 नोव्हेंबर 2025 रोजी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून पीक विमा योजनेमध्ये नवीन ट्रिगर लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना एक मोठा आधार मिळाला आहे
पिक विमा योजनेत कोणते बदल करण्यात आले
केंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकतेच एक विमा योजनेतील काही महत्त्वाचे मुद्दे बदलण्यास मंजुरी दिली आहे या माध्यमातून सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे
वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान आता कव्हर होणार आजपर्यंत वन्यप्राण्यांमुळे
- नीलगाय
- माकड
- हाती
- जंगली डुक्कर आणि इतर वन्य प्राणी यांच्या मुळे होणारे पिकांचे नुकसान पिक विमा च्या अंतर्गत समाविष्ट नव्हते त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते अत्यंत कठीण झाले होते आता मात्र या नुकसान अधिकृतपणे पिक विमा मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांच्या दैनिक आणि मोठ्या प्रमाणातील तक्रार लक्षात घेण्यात आला आहे
अतिवृष्टी आणि पाणी साचणे याचाही समावेश
2025 मध्ये पंजाब गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ या अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पाणी येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते आता विशेष भात (धान) पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहेत परंतु विद्यमान नियमामुळे शेतकऱ्यांना विमा मिळण्यास मोठी अडचण येत होती आता त्या बाबीही नवीन नियमात समाविष्ट करण्यात आल्या आहेत
तक्रार नोंदणी ची नवीन सोय 72 तासात नोंदणी
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची तक्रार नोंदवण्यासाठी आता 72 तासाच्या आत ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार नोंदवता येणार आहे तक्रार नोंदणी प्रक्रिया सोपी आणि जलद करण्या या वर भर दिला जाणार आहे
कधीपासून लागू होणार आहे नवीन नियम
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या पाठपुराव्यानंतर येथे ट्रिगर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खरीप हंगाम 2025-26 पासून संपूर्ण देशात नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना लाभ होणार आहे नवीन नियमानुसार सुधारित मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर होणार असून त्या सूचनेच्या आधारे पुढील सर्व पिकासाठी विमा प्रक्रिया राबवली जाणार आहे
या निर्णयाचा शेतकऱ्यांना होणार फायदा
नवीन बदलामुळे शेतकर्यांना खालील मोठे फायदे मिळणार आहेत
- वन्यप्राण्यांमुळे होणार नुकसानीचे नुकसान भरपाई मिळणार शेती जवळ जंगल क्षेत्र डोंगर भाग नदी किनारा शेत असलेल्या शेतकऱ्यांना यांचा मोठा फायदा होईल
- अतिवृष्टीमुळे पिकाची होणारी हनी ही कव्हर विशेष भाग पिकांसाठी हा निर्णय वरदान ठरणार आहे
- 72 तासात तक्रार नोंदणी प्रक्रिया सोपी होणार शेतकऱ्यांना वेळेवर दावा करता येणार असल्यामुळे भरपाई मिळणे सोपे होईल
- देशभरातील लाखो शेतकऱ्यांचा प्रश्न तुटणार या सुधारणा मागील अनेक वर्षाच्या शेतकऱ्यांच्या मागण्या वर आधारित आहे
2025 मधील समस्या आणि केंद्राचा निर्णय
2025 मध्ये अतिवृष्टी परिस्थिती पाणी साठणे आणि वन्य प्राण्यांमुळे नुकसान या कारणामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती पिक विम्यातील जुने नियम आणि नुकसान येतील लाखो शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही या तक्रारी केंद्राला प्राप्त झाल्यानंतर अखेरीस पिक विमा योजनेतील ट्रिगर बदलण्याचा निर्णय झाला
खरीप पिक विमा 2026 पासून शेतकर्यांसाठी नवीन आशा
- खरीप 2026 पासून
- नवीन मार्गदर्शक तत्त्वे
- वन्यप्राणी नुकसान भरपाई
- अतिवृष्टी कव्हर
- जलसंचालनामुळे पिकांचे नुकसान भरपाई
हे सर्व राष्ट्रीय स्तरावर प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू होणार आहे
शेवटी निकर्ष : हा निर्णय शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा आहे आज पर्यंत जे नुकसान भरपाई च्या बाहेर राहिले होते आता तेही विमा योजनेत समाविष्ट झाले आहे पीक विमा योजनेत अधिक सुलभ आधुनिक आणि शेतकरी हिताच्या बनला आहे खरीप 2026 पासून शेतकऱ्यांना अधिक सुरक्षा आणि अर्थात मध्ये आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे





