pm Kisan scheme :
पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यांना 2 हजार रुपये दिले जाणार आहेत त्यासाठी अर्ज प्रक्रिया 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे
पंतप्रधान किसान योजनेच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना (pm Kisan Samman Nidhi Yojana) या योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यांना 2 हजार रुपये दिले जाणार आहेत त्यासाठीची अर्ज प्रक्रिया 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे पंतप्रधान किसान योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा केले जातात
आतापर्यंत या योजनेचे 19 हप्ते जमा झाले आहेत म्हणजे 38 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत या योजनेचा विसावा हप्ता ही लवकरात जारी केला जाणार आहे पण याच्या लाभापासून विविध कारणांनी वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही असा प्रश्न पुढे येत होता कागदपत्रातील त्रुटीमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत शेतीचा वारसा बदलणे शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याची मालकी बदलणे आदी कारणांनी शेतकरी लाभापासून वंचित आहेत
काहीच्या बँक खात्यात त्रुटी आहेत तर काहींना सुरुवातीचे काही काही हप्ते मिळाले नंतर बंद झाले आहे लाभ मिळावा यासाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देत आहे या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे 15 एप्रिल पासून नव्याने नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे या योजने अंतर्गत लहान शेतकरी अर्ज करू शकतात शेतकऱ्यांची नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमीनीच्या नोंदीमध्ये नोंदवलेले असावे तसेच आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल क्रमांक योजनेशी जोडलेले असावेत या शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करता येईल या शेतकऱ्यांना मागे लागते मिळणार काय याबाबत मात्र स्पष्टता नाही
pm Kisan scheme:लाभार्थ्यांनी नोंदणीसाठी असा करावा अर्ज
योजनेचे अधिकृत संकेतस्थळ वर नोंदणी करता येईल नवीन शेतकरी हा पर्याय निवडावा राज्य आधार क्रमांक मोबाईल क्रमांक नोंदवावा ओटीपी नोंद शेतकऱ्यांची व्यक्तिगत माहिती जमिनीची माहिती बँक खाते ची माहिती भरुन अर्ज सबमिट करावा तलाठी कार्यालय कृषी सहाय्यक वामन सेवा केंद्रातून ऑफलाईन अर्ज भरता येईल