Crop Insurancs:
कृषी विभागाने विमा कंपन्या सोबत पिक विमा योजना राबविण्यासाठी केलेले करार एक वर्ष आधीच रद्द केले व योजना राबवताना विमा कंपनीची केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे तसेच पीक विमा योजनेत बदल होऊन सुधारित योजना निश्चित झाले आहे 1 रुपयात पिक विमा बंद करणे आणि केवळ पिक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई देणे हे बदल सुचविण्यात आले आहेत ते बदल जवळपास निश्चित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे
राज्यात पिक विमा योजना राबविण्यासाठी कृषी विभागाने विमा कंपनी सोबत खरीप 2023 ते रब्बी हंगाम 2025 पर्यंत करार केले होते ते एकूण बारा कंपन्यांसोबत विविध जिल्हा समूहामध्ये 80 : 110 मॉडेल नुसार योजना राबवण्यासाठी करार करण्यात आले होते 26 जून 2023 रोजी याविषयी आदेशही काढण्यात आला होता तसेच शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पिक विमा योजना आणून शेतकऱ्यांच्या त्याचा हप्ता राज्य सरकारने भर देण्याचे ठरवले होते पण पिक विमा योजनेत बदल करण्याचा सरकारचा मानस आहे त्यामुळे सरकारने सर्व विमा कंपन्या सोबत एक वर्ष आधीच करार रद्द केला आहे
वास्तविक कराराची मुदत रब्बी 2025 – 26 म्हणजेच पुढील वर्षीचा रब्बी हंगामापर्यंत होती परंतु कृषी विभागाचे आयुक्त सुरज मांढरे यांनी 2 एप्रिल 2025 रोजी सर्व मिळून कंपन्यांसोबत करार रद्द केल्याचे आदेश काढले आहेत म्हणजेच पिक विमा योजनेचे कंपन्यांसोबत करार संपले आहेत आता नव्याने करार करण्यात येतील