शेतकऱ्यांना धक्का: नुकसानभरपाईत कपात – 1 जानेवारी 2024 चा जीआर रद्द, नवीन नियम लागू nuksan bharpai list 2025 maharashtra pdf download

मित्रांनो, 30 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी, अवेळी पाऊस, पूर परिस्थिती इत्यादी नैसर्गिक आपत्तीसाठी दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. याची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो, आता बरेच जण म्हणतील – “मोठा निर्णय काय? अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळत नाही, केवायसी केली तरी तीन महिने पैसे येत नाहीत, घोषणा केली तरी पैसे मिळत नाहीत.” त्याच्यापेक्षा सुद्धा हा निर्णय महत्त्वाचा आहे कारण आजच्या जीआरमुळे 1 जानेवारी 2024 चा जीआर अधिक्रमित केला जाणार आहे, अर्थात रद्द केला जाणार आहे.

मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना, नव्हे देशातील शेतकऱ्यांना, एनडीआरएफच्या अंतर्गत जर काही नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं तर ती नुकसानभरपाई देण्यासाठी नवीन धोरण लागू करण्यात आलेलं आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये राज्य शासनाने हे केंद्राचे धोरण स्वीकृत केलेलं आहे. त्यानुसार, एनडीआरएफच्या निकषानुसार दिली जाणारी 6800 रुपयांची नुकसान भरपाई ही आता 8500 रुपये प्रति हेक्टर करण्यात आलेली आहे.

मित्रांनो, हा जीआर नोव्हेंबर 2023 पासून लागू झाला आहे. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी ही रक्कम कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिली जात होती. यामध्ये 13600 रुपये प्रति हेक्टर अशी नुकसान भरपाई देण्याची मंजुरी होती.

याचप्रमाणे, 1 जानेवारी 2024 रोजी एक जीआर निर्गमित करून राज्य शासनाने 8500 रुपये न देता त्याऐवजी 13600 रुपये प्रति हेक्टर जिरायत क्षेत्रासाठी नुकसान भरपाई देण्याची मंजुरी दिली होती. परंतु आजच्या जीआरद्वारे ही मंजुरी रद्द करण्यात आलेली आहे. 1 जानेवारी 2024 चा जीआर अधिक्रमित करून नवीन जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे.

यामध्ये आपण पाहू शकता की केंद्र शासनाच्या सूचनानुसार राज्यांना शेतकऱ्यांना एकवेळच निविष्ट अनुदान देण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना भरपाई दिली जाते. जिरायत क्षेत्रासाठी 8500 रुपये, भांडी असतील, कपडे असतील, दुकानांचे इतर नुकसान असेल – त्यासाठीचे निकष ठरवण्यात आलेले आहेत.

जर तुम्ही नोव्हेंबर 2023 चा जीआर पाहिला नसेल, तर मी त्याची लिंक सजेशनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवतो. त्यातून तुम्हाला कळेल की, नेमकी नुकसान भरपाई कोणत्या क्षेत्रासाठी किती दिली जाते.

याच ठरलेल्या दरानुसार नुकसान भरपाई देण्यासाठी अखेर 30 मे 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजे आता नोव्हेंबर 2023 च्या जीआरनुसार – आवेळी पाऊस, पूर परिस्थिती, अतिवृष्टी, शेती पिकाचं नुकसान यासाठी दिली जाणारी मदत आणि त्याचे दर, निकष 27 मार्च 2023 रोजी ठरवलेले आहेत. त्यानुसारच आता नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

यानुसार मिळणारी नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना अतिशय कमी आणि तोकडी मिळणार आहे. याचा अर्थ दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये कपात करण्याचा निर्णय आज घेण्यात आलेला आहे.

मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनांचे लाभ, न मिळालेली कर्जमाफी, न मिळणारा पीक विमा, नैसर्गिक आपत्तीमुळे वाताहात झालेला शेतकरी आणि या सर्वांमध्ये आता राज्य शासनाच्या माध्यमातून हा एक नवीन फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांतील रोष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मित्रांनो, हा जीआर आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे.

  • नुकसान भरपाई नवीन जीआर 2025
  • 30 मे 2025 शासन निर्णय
  • शेतकरी नुकसान भरपाई मराठीत
  • अतिवृष्टी नुकसान भरपाई माहिती
  • 1 जानेवारी 2024 जीआर रद्द
  • शेतकरी योजना 2025 महाराष्ट्र
  • पूर व अवेळी पावसाची मदत
  • राज्य शासन नुकसान भरपाई
  • एनडीआरएफ नुकसान भरपाई दर
  • शेतकरी GR अपडेट 2025
  • nuksan bharpai list 2024 maharashtra pdf download
  • nuksan bharpai list 2025 maharashtra pdf download

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment