मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2025 : महिलांना मिळणार तीन मोफत गॅस सिलेंडर mukhyamantri annapurna yojana free gas cylinder

राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक दिलासादायक घोषणा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थींना तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंतर्गत ज्यांचं नाव गॅस कनेक्शनवर आहे अशा महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत. ही योजना ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ या नावाने ओळखली जाते.

mukhyamantri annapurna yojana free gas cylinder 2024-25 आर्थिक वर्षात या योजनेतून पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये तीन सिलेंडरच्या सबसिडीची रक्कम DBT (Direct Benefit Transfer) च्या माध्यमातून जमा करण्यात आली होती. आता 2025-26 या नवीन आर्थिक वर्षातही योजना राबवली जाणार असून, ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यांदरम्यान नव्या हप्त्याची रक्कम लाभार्थींना मिळणार आहे.

जुलै 2024 पासून राज्यात ‘माझी लाडकी बहीण’ योजना सुरू झाली आणि जुलै 2025 मध्ये योजनेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षातील अनुदान देण्यासाठी राज्य शासनाने विविध विभागांना निधी वाटप सुरू केले आहे. 10 जुलै 2025 रोजी आदिवासी विकास विभागाला अनुसूचित जमातींसाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी 15 कोटी रुपये DBT साठी वितरित करण्यात आले आहेत.

योजनेच्या अंमलबजावणीअंतर्गत, प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरबाबत आधीच केंद्र सरकारकडून काही सबसिडी मिळते. आता राज्य सरकारकडून तीन सिलेंडर मोफत दिले जात असल्यामुळे, महिलांना अधिक आर्थिक सवलत मिळणार आहे. नियमांनुसार, एका महिन्यात एक सिलेंडर आणि वर्षात जास्तीत जास्त तीन सिलेंडरसाठी हे अनुदान दिले जाणार आहे.

लवकरच इतर विभागांचे, जसे की सर्वसाधारण प्रवर्ग आणि अनुसूचित जातींचे निधी वाटप देखील पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे येत्या काही आठवड्यांतच पात्र महिलांच्या खात्यात तीन गॅस सिलेंडरची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाच्या या उपक्रमामुळे गरीब महिलांना गॅससारख्या मूलभूत गरजेच्या सेवेत दिलासा मिळणार आहे. यामुळे घरगुती अर्थसंकल्पात थोडा भार कमी होणार असून, महिलांच्या आरोग्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment