Maha DBT Farmer scheme 2025 : ट्रॅक्टर ट्रॉलीवर 1 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळवा – संपूर्ण मार्गदर्शन

tractor trailer subsidy 2025 : शेतकऱ्यांमध्ये बऱ्याचदा असा प्रश्न असतो की ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला अनुदान मिळतं का? जर मिळत असेल तर त्यासाठी किती अनुदान दिले जात आवश्यक कागदपत्र कोणती आहेत आणि अर्ज कोठे करावा सर्व बाबी बद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत

ट्रॅक्टर ट्रॉलीला अनुदान मिळतं का

हो मित्रांनो राज्यात ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीला वाहतूक साधनांमध्ये अनुदान मिळत आहे अनुदान ट्रॅक्‍टरचलित यंत्र अवजाराच्या अंतर्गत वाहतूक संसाधने साठी देण्यात येते विशेष म्हणजे ट्रॉली दोन प्रकारच्या वजनानुसार अनुदानासाठी पात्र ठरते तीन टणापर्यंतची ट्रॉली आणि पाच टनापर्यंत ची ट्रॉली

5 जून 2025 च्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकार राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवत आहे त्यासाठी 400 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे या पैकी 200 कोटी रुपयांचा निधी अनुदान वितरण यासाठी वापरला जात आहे

ट्रॉलीच्या प्रकारानुसार अनुदानाची रक्कम

  • तीन टनापर्यंतची ट्रॉली : यासाठी प्रकल्प खर्च अंदाजे 1.5 लाख रुपये धरला जातो अशा उरलेला 50 टक्के अनुदान म्हणजेच 75 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जातात
  • पाच टनापर्यंतची ट्रॉली यासाठी प्रकल्प खर्च 2 लाख रुपये धरला जातो अशा ट्रॉलीला एक लाख रुपये पर्यंत अनुदान मिळू शकतो

अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता आहे जे लॉटरी प्रक्रिया नंतर अपलोड करावे लागतात यामध्ये मुख्य खालील कागदपत्रे लागतात

  • जमिनीचा सातबारा (खाजगी किंवा कौटुंबिक नावावर)
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • ट्रॅक्टरचे आरसी बुक तुमच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असावे

याशिवाय अर्ज करताना ट्रॅक्टर असणे अनिवार्य आहे फक्त अशाच शेतकऱ्यांना ट्रॉलीसाठी अनुदान मिळू शकते त्याच्या कडे वैद्य ट्रॅक्टर आहे

अर्ज प्रक्रिया

ट्रॉलीसाठी अनुदान अर्ज महाडीबीटी फार्मर स्कीम ( MHA DPT farmer ) पोर्टलवर ऑनलाइन केला जातो यासाठी अर्जदाराला पोर्टलवर लॉगिन करून आवश्यक माहिती भरावी लागतील आणि मागेन कागदपत्रे अपलोड करावी लागतात

लाभ घेण्याचे महत्त्वाचे मुद्दे

ट्रॉली अनुदान हे राज्यातील कृषी यांत्रिकीकरणाच्या योजनेअंतर्गत देण्यात येते अर्जदाराने ट्रॅक्टरची नोंद वैधता असणे आवश्यक आहे अनुदानाची रक्कम ट्रॉलीच्या वजनानुसार निश्चित केली जाते सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज पूर्ण मानला जात नाही

शेवटी

मित्रांनो ट्रॅक्टर ट्रॉलीवर अनुदान शेतकऱ्यांसाठी मोठी मदत करते या अनुदानामुळे शेतकऱ्यांना वाहतूक खर्च कमी करता येतो आणि उत्पादनाचे व्यवस्थापन अधिक सोपे होते तुमच्याकडे ट्रॅक्टर आहे आणि ट्रॉलीसाठी अर्ज करण्याची तयारी करत आहात तर महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नक्की करा आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा नवीन अभ्यास नियम आणि अनुदानाची रक्कम बदलू शकतात त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने सरकारी पोर्टलवरून अधिकृत माहिती नियमित तपासणे गरजेचे आहे याद्वारे मित्रांनो आपण ट्रॅक्टर ट्रॉलीवर अनुदान मिळण्याबाबत संपूर्ण माहिती योग्य माहिती आणि तयारीने अर्ज केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा होईल

Leave a Comment