राज्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंद वार्ता आली आहे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे लाडक्या बहिणींना निकषांना आणि E-KYC ला सामोरे जावे लागत असले तरी सरकारने त्यांच्यासाठी अजून एक मोठा पाऊल टाकले आहे त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येणार आहे यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे मुंबई आणि जवळपासच्या क्षेत्रात त्यांची अंमलबजावणी होत असताना राज्यातही लवकरच त्याची अंमलबजावणी करण्यात येईल
मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुरू झाली होती या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 रुपये दरमहा देण्यात येतात हे पैसे डीबीटी अंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात या योजनेमुळे राज्यांमधील महिलांना आर्थिक लाभ मिळतो व ग्रामीण भागातील महिलांना त्यांचा लाभ मिळत आहे तर इतर काही योजना चा फायदा घेणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा मिळणारा नसल्याचे सरकारने अगोदर स्पष्ट केलेले आहे
या योजनेत महिलांना व्यवसाय साठी आता 1 लाखापर्यंत कर्ज पुरवठा करण्यात येणार असल्याचे समोर येत आहे महिलांना 0 टक्के व्याजदराने हा कर्जपुरवठा केला जाऊ शकतो मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे मुंबई तील बँकेने 3 सप्टेंबर पासून ही योजना लाडक्या बहिणीसाठी सुरू केली आहे या योजनेत एक लाखापर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्यात येत आहे सध्या योजना मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये लागू आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये लवकर योजना लागू होऊ शकते त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिलांना त्यांचा उद्योग व्यवसाय उभा करता येणार आहे त्यांना एकत्र येऊन व्यवसाय करण्याची सर्वात मोठी संधी मिळणार आहे
2100 शंभर रुपये चा हप्ता केव्हा मिळू शकतो
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना प्रति महिना पंधराशे रुपये अनुदान दिले जाते लवकरच हे अनुदान 2100 रुपये करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे पण त्याची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही या मिळणाऱ्या मनातून कर्जाचे हप्ते वसूल केले जाणार आहेत असे लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल नुसार योजनेसाठी 1,12,70,261 इतकी अर्ज प्राप्त झाले आहेत तर 1,06,69,139 अर्ज मंजूर झाले आहेत