राज्यात पवित्र पोर्टल मार्फत शिक्षण भरती होत असताना दुसरीकडे राज्यांमध्ये प्राध्यापकाच्या मात्र बारा हजारापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत त्यात अनेक प्राध्यापक हे पीएचडी तसेच नेट-सेट असूनही त्यांना पदापासून वंचित राहावे लागत असल्याचे समोर आले तर अनेक महाविद्यालयात प्राध्यापक तारिका तत्वावर कंत्राटी पद्धतीने काम करत आहे राज्यांमध्ये 11 सार्वजनिक विद्यापीठ आणि 1 हजार 172 अनुदानित महाविद्यालय मध्ये 33 हजार 763 प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत त्यातील एक 21 हजार 236 पदांवर प्राध्यापक कार्यरत असून 12 हजार 526 जागा रिक्त आहेत मागील पाच वर्षात राज्यात केवळ 2हजार 88 पदांची भरती झाले आहे
विविध संघटनेची मागणी केंद्र शासनाने जाहीर केलेली नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्यात लागू झाले असून त्यात अंमलबजावणीसाठी प्राध्यापकासह शिक्षकेत्तर कामाची रिक्त पदे भरणे आवश्यक आहे मात्र रिक्त पदांमुळे धोरणाच्या अंमलबजावणीत अडचणी येत असल्याचे चित्र आहे त्यामुळे 4 हजार 300 प्राध्यापकांची पदे भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव उच्चशिक्षण विभागाने वित्त विभागाकडे सादर केला मात्र त्यावर निर्णय झालेला नाही राज्यात अनेक वर्षापासून प्राध्यापकांची भरती रखडलेले आहे
प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे लवकरात भरावी अशी मागणी विविध संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 75 टक्के जागा भरण्याच्या आदेश सर्व राज्यांना आहेत त्यानुसार राज्यात उच्चशिक्षण विभागाने 4,300 प्राध्यापकाच्या भरतीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे
त्यावर निर्णय कधी होणार महेश घरबुडे अध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन गेल्या एक वर्षापासून भरती होत नाही नेट सेट तसेच पीएचडी पात्रताधारक प्राध्यापकांना न्याय मिळावा यूजीसीच्या नियमानुसार सर्व विद्यापीठ व महाविद्यालयात प्राध्यापकाची मंजुरी पदाची भरती प्रक्रिया लवकरात पार पाडली पाहिजे तासिका किंवा मानधनावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना आपल्या हक्काची नोकरी मिळावी प्रशांत शिरगुर राज्य उपाध्यक्ष पवित्र शिक्षण भरती संघटना