सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टी व पुरामुळे हिंगोलि जिल्ह्या मधील पाच तालुक्यातील एक लाख पाच हजार 120 शेतकर्यांचे जिरायती बागायती फळपिकांचे मिळून एकूण 55 हजार 372.70 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना मदती साठी आवश्यक 64 कोटी 61 लाख 83 हजार रुपये निधी वितरणास महसूल आणि वन विभागाने बुधवारी दिनांक 15 काढलेला शासन निर्णय द्वारे मंजुरी देण्यात आली सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी ओढे-नाले नद्यांच्या पुरामुळे हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन, तूर, कपाशी ज्या अधिक मिळून 36 हजार 298 हेक्टरवर जिरायती पिके भाजीपाला कांदा, ऊस, मिरची, च्या आधिक मिळून
16 हजार 642 हेक्टरवरील बागायती पिके तसेच केळी लिंबू, मोसंबी, संत्रा, आंब आदी मिळून 2,432.70 हेक्टरवरील फळपिके असे एकूण 55 हजार 372.70 हेक्टर पिकाचे 30 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे बाधित शेतकऱ्यांना जिरायती पिकाच्या ( ट्रॅक्टर अनुदान) नुकसानीपोटी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये नुकसान 30 कोटी 85 हजार 33 हजार रुपये बागायती पिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी 17 हजार रुपया नुसार 28 कोटी 29 लाख 14 हजार रुपये फळपिकांच्या नुकसानीपोटी हेक्टरी 22 हजार पाचशे रुपये नुसार पाचशे कोटी 47 लाख 35 हजार 750 रुपये मिळून एकूण 64 कोटी 61 लाख 82 हजार 750 रुपये निधीची मागणी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली होती बाधित शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादित अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे (पीएम किसान 21 वा हप्ता)
हिंगोली जिल्हा सप्टेंबर 2025 अतिवृष्टी मंजूर निधी किती क्षेत्र हेक्टर मध्ये
तालुके | बाधित शेतकरी | बाधित क्षेत्र | मंजूर झालेले निधी |
औंढा नागनाथ | 12430 | 10733 | 9 कोटी 71 लाख 26,500 |
हिंगोली | 16093 | 1,5007 | 13 कोटी 7 लाख 81 हजार रुपये |
कळमनुरी | 10975 | 10194 | 11 कोटी 85 लाख 53 हजार 500 |
वसमत | 65543 | 19383 | 30 कोटी 11 लाख 85 हजार 500 रुपये |
सेनगाव | 79 | 54.90 | 12 लाख 35,000 250 रुपये |