महाराष्ट्राने मागेल त्याला सौर कृषिपंप या महत्वकांक्षी योजनेचा जागतिक पातळीवर ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे महावितरण अवघ्या एका महिन्यात तब्बल 45 हजार 911 सौर कृषी पंप बसवण्याचा उचाकी घातला असून या कामगिरीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली आहे हा विक्रम केवळ आकड्याचा नसून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात घडलेल्या एका मोठ्या परिवर्तनाचा प्रतीक आहे या विक्रम आमण बद्दलचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान सोहळा शुक्रवारी दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजी नगर येथील शेंद्रा एमायडिसी मधील ओरीक सिटी मैदानावर आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरुवातीपासूनच या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी वर विशेष भर दिला असून यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र संपूर्ण देशातील सर्वाधिक सौर कृषीपंप बसवण्याचा मान पटकावला आहे
या विक्रमामुळे महाराष्ट्राची ओळख केवळ औद्योगिक किंवा कृषी राज्य म्हणून नव्हे तर हरित ऊर्जेच्या माध्यमातून शेतीला स्वावलंबी बनवण्याचे ध्येय ठेवून राबवण्यात येणारी मागेल त्याला सौर कृषीपंप योजना आज राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे पारंपारिक विजेवरील अवलंबित्व कमी करणे विजेवरील वीजबिलाचा भार काटने आणि दिवसा नियमित सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्रमुख उद्देश आहेत या वीज टंचाई भारनियमन आणि अनियम वीज पुरवठा अशा समस्यांमधून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये सुटका झाली आहे
मागेल त्याला सौरपंप योजना अनुदान लाभ आणि शेतकऱ्यांसाठी फायदे
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कुसुम योजनेच्या अंतर्गत राबवली जात आहे या योजनेत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून 30 टक्के तर राज्य सरकारकडून 60 टक्के एकूण 90 टक्के अनुदान दिले जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर कृषी पंपा सह संपूर्ण संच मिळतो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तील शेतकऱ्यांसाठी ही सवलत आणखीन वाढवण्यात आली असून त्यांना फक्त 5 टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो राज्यात पुढील टप्प्यात सुमारे साडेदहा लाख सौर कृषी पंप बसवण्याचे उद्देश ठेवण्यात आले आहे सध्या कृषी पंप साठी पैसे भरून वीज जोडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या म्हणजेच पेड पेंटिंग शेतकऱ्यांचा प्रश्न या योजनेमुळे कायमस्वरूपी सुटणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी वेळेवर पाणी मिळवणे आता अधिक सुलभ होणार आहे या योजनेसाठी महावितरणने स्वतंत्र ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे
शेतकऱ्यांनी या पोर्टलवर ऑनलाईन केल्यानंतर अर्जाची छाननी होते आणि मंजुरी मिळाल्यानंतर अधिकृत द्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषी पंप येतो पंप बसवल्यानंतर पुढील देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित एजन्सी वरच असते ही बाब शेतकऱ्यांना साठी मोठी दिलासादायक आहे सौर पॅनल मधून साधारण 25 वर्ष वीज निर्मिती होते त्यामुळे या काळात शेतकऱ्यांना कृषीपंपासाठी कोणतेही वीज बिल भरावे लागत नाही हे पारंपारिक वीज पुरवठ्यावर अवलंबून असल्याने शेतकरी दिवस आपल्या सोयीप्रमाणे कधीही सिंचन करू शकतात त्यामुळे वर्षानु वर्षे प्रलंबित असलेले दिवसा वीज मिळावी ही मागणी आता प्रत्यक्षात पूर्ण होत आहे या योजना शेतकऱ्यांना उत्पन्न खर्च कमी होत असून उत्पादनात वाढ होत आहे वेळ पैसा आणि श्रम यांची बचत देखील होत आहे शेती अधिक फायदेशीर बनते आहे त्याचबरोबर हरित ऊर्जेचा वापर वाढल्याने पर्यावरण संरक्षणाला ही मोठे स्थान मिळत आहे म्हणूनच मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही केवळ एक शासनाची योजना न राहता महाराष्ट्रातील शेती क्षेत्र घडवणारी एक क्रांतिकारी पाऊल ठरत आहे





