केंद्र सरकारने आता शेतीसाठी सिंचन सुविधा आणि पाण्याच्या आधुनिक व्यवस्थापनासाठी कृषी सिंचन योजना अंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट (M-CADWA)या उपयोजने 2025- 26 पर्यंत लागू करण्यात मंजुरी दिली आहे यासाठी सोळाशे कोटीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना पर्यंत वेळेवर व आवश्यकतेनुसार सिंचन पाणी पोहोचवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे योजने अंतर्गत देशभरातील जुन्या कालावधीची कालव्याची पुनर्बांधणी करून त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात येणार आहे
जेणेकरून पाण्याचा ब्याव थांबेल आणि शेतीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल योजनेत हायटेक प्रणालीचा वापर केला जाईल त्यामुळे शेती पातळीवर पाण्याच्या वापराचे अचूक नियोजन करता येईल विशेष एक हेक्टर पर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांसाठी जमिनीतून दबावाने पाणी पोहोचवणारी पाईप लाईन प्रणाली बसवली जाईल त्यामुळे सूक्ष्म सिंचनाला चालना मिळेल आणि उत्पादनाची गुणवत्ता तसेच मात्र दोन्ही सुधारेल या योजनेचा आणखीन एक महत्त्वाचा पेहलू म्हणजेच सिंचन व्यवस्था चा कारभार वाटर युजर सोसायट्या कडे सोपवला जाणार आहे
आणि त्यांना पुढील पाच वर्षे सरकारी मदत दिली जाणार आहे आणि त्यांना शेतकरी उत्पादक संघटना व प्राथमिक कृषि सहकारी संस्थेची जोडण्यात येईल जेणेकरून या संस्था आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवू शकतील शेतीला एक लाभदायक तंत्रज्ञान आधारित आणि आधुनिक व्यवसाय म्हणून विकसित करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे यामुळे ग्रामीण भागात रोजगार वाढेल तरुणांमध्ये नव्या कृषी प्रणाली विषयी उत्साह निर्माण होईल आणि देशाची कृषी अर्थव्यवस्था अधिक शाश्वत व सक्षम बनेल