अजित पवार “इतर अनेक ठिकाणीही निवेदनं दिली जात आहेत. माझ्या लाडक्या बहिणी तिथं बसल्या आहेत, त्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो – कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज पसरवले जातात, विरोधक याबाबत अफवा पसरवतात.
लाडकी बहीण, आम्ही दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये देतो. मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो की, या योजनेतील लाभार्थी असणाऱ्या माझ्या बहिणींना ही योजना कधीही बंद केली जाणार नाही. ही योजना खास माझ्या बहिणींसाठी आहे, जी त्यांना मदत करते.
आम्ही या योजनेत नवीन प्रस्ताव सुद्धा आणले आहेत. काही बँका यासाठी पुढे आल्या आहेत. नांदेड जिल्हा बँकेशी मी स्वतः बोलेन. काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगलं काम करत आहेत.
बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आज आम्ही जे 1500 रुपये देतो, त्याऐवजी त्या बहिणींना ३० ते ४० हजार रुपयांचं भांडवल मिळेल आणि त्या हप्त्यांमध्ये परतफेड करू शकतील. जर माझ्या बहिणीला ४० हजार रुपये भांडवल मिळालं, तर ती स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते आणि तिचं कुटुंब उभं करू शकते.
महाराष्ट्रातील काही भगिनींनी हे करून दाखवलं आहे. मी माझ्या नांदेडमधील, चव्हाणवाडी परिसरातील बहिणींना सांगू इच्छितो की, तुम्हीही याचा विचार करा.
मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना आणि महिला भगिनींना सांगणार आहे की ही योजना कशी आहे आणि याचा फायदा कसा घ्यायचा.
शेवटी, फक्त सांगून प्रश्न सुटत नाही. यासाठी काही कार्यक्रम राबवावे लागतात. आणि असा कार्यक्रम आम्ही दिला आहे. त्याचं स्वागत करा आणि त्याचा फायदा घ्या.
हीच माझी आपल्याला नम्र विनंती आहे.