लाडकी बहिण 26 लाख महिला हप्ते बंद | Ladki Bahin Yojana Installment

माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत सुमारे 26 लाख महिलांचे हप्ते सरकारने तात्पुरते बंद केले आहेत. या निर्णयामागचं कारण सरकारने स्पष्ट केले आहे. महिला व बालविकास विभागाने सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून माहिती मागवली होती. या माहितीच्या आधारे माहिती व तंत्रज्ञान विभागाने सादर केलेल्या अहवालात असं दिसून आलं की काही महिला अपात्र असूनही त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे.

काहींनी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतला असून काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. तसेच काही ठिकाणी पुरुषांनी देखील अर्ज केल्याचं समोर आलं आहे.

या सगळ्या कारणांमुळे सरकारने जून 2025 पासून या 26 लाख महिलांचा लाभ तात्पुरता स्थगित केला आहे. याशिवाय, 2.25 कोटी पात्र महिलांना मात्र जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. सरकारने हेही स्पष्ट केलं आहे की ज्या महिलांचा लाभ थांबवण्यात आलेला आहे, त्यांच्या अर्जांची चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केली जाईल. ज्यांची शहानिशा होईल आणि जे पात्र ठरतील, त्यांना पुन्हा योजनेचा लाभ दिला जाईल.

शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या अर्जदारांविरोधात कोणती कारवाई करायची, यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांमध्ये चर्चा होणार असून त्यानंतर निर्णय घेतला जाणार आहे. सरकारने दिलेली ही सगळी माहिती अत्यंत महत्त्वाची असून पुढील निर्णय लवकरच घेतले जातील. पात्र महिलांनी काळजी करू नये, त्यांना पुन्हा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment