eNews Ticker

या शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान जमा होणार Kyc Anudan 2025

मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करण्यात आलेली होती परंतु केवायसी केल्यानंतर सुद्धा ही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्यात आलेली नव्हती अशी ही थकीत असलेली शेतकऱ्यांची अनुदान ही आता या मार्च एंड पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पूर्णपणे क्लिअर करण्याचा एक शासनाचा मानस आहे आणि तशा प्रकारचे अपडेट आता समोर येत आहेत अर्थात ज्या शेतकऱ्यांनी केवायसी Kyc Anudan 2025 पूर्ण केलेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या अनुदान ही येत्या 15 दिवसांमध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली
जाण्याची शक्यता आहे

Kyc Anudan 2025 : मित्रांनो या बरोबर महाडीबीटीच्या माध्यमातून राबवल्या जाणारे यांत्रीकरणाच्या बाबी असतील ठिबक सिंचन तुषार असेल या बाबींच्या अनुदानाचं वितरण करण्यासाठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली होती परंतु अद्यापही हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला नव्हता मोठ्या प्रमाणात याच्या अंतर्गत देखील शेतकरी पात्र असून सुद्धा त्यांच्या सर्व बाबी पूर्ण असून सुद्धा हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेलं नव्हतं आणि या अनुदानाचं वितरण सुद्धा साधारणपणे 17 मार्च पासून म्हणजे येत्या सोमवार

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करायला सुरुवात होते होणार आहे

मित्रांनो याच्या व्यतिरिक्त एक महत्त्वाचं असं अनुदान ते म्हणजे दुधाचं अनुदान शेतकऱ्यांना प्रति लिटर सात रुपये दुधाचं अनुदान जाहीर केलं काही अनुदान पाच रुपये लिटर न जाहीर केलेलं देखील थकीत होतं असं थकीत असलेलं सप्टेंबर पर्यंत अनुदान आता पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केलं जाणार असून याच्यानंतर शेतकऱ्याचं उर्वरित असलेलं सात रुपये प्रति लिटरचा अनुदान सुद्धा याच महिन्याच्या एंड पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलं जाणार

असल्याची माहिती समोर येत आहे आणि याच्यासाठी सुद्धा 739 कोटी रुपयाचा निधी हा शासना च्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे मोठ्या प्रमाणात याच्यापैकी निधीचे वितरण करण्यात आलेले आहे साधारणपणे या 15 दिवसांमध्ये 139 कोटी पेक्षाची जास्त रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाऊ शकते त्याच्यामुळे महाडीबीटीचा अनुदान असेल अतिवृष्टीची थकीत अनुदान असतील किंवा हे जे काही बाकीचे अनुदान असतील हे अनुदान आता शासनाच्या माध्यमातून या 31 मार्च पूर्वीच वितरित केला जाण्याची शक्यता आहे

मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर शासनाच्या माध्यमातून जे काही पीक विम्यासाठीचा निधी आहे हा निधी देण्यात आलेला आहे परंतु पीक विमा कंपनीच्या माध्यमातून अग्रिम किंवा 50% रक्कम मिळाल्यानंतर सुद्धा उर्वरित हप्त्याकडे पाहिलं जातंय आणि या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांचा पीक विमा अद्याप देखील वितरित करण्यात आलेला नाही याच्यामध्ये सुद्धा काही जिल्ह्यामध्ये जसे यवतमाळ असेल किंवा इतर काही जिल्हे असतील थोड्या मोठ्या प्रमाणात पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आता वितरण सुरू केलेले आहे

अशी अपडेट समोर येत आहे की याच आठवड्यामध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये शासनाच्या माध्यमातून पीक
विमा योजनेचा उर्वरित असलेला दुसरा हप्ता सुद्धा वितरित केला जाऊ शकतो आता त्याच्या संदर्भातील खात्रीत आहे किंवा जीआर आला तर ते अपडेट देखील आपण नक्की घेऊ परंतु तो हप्ता वितरित करणं हा दुसरा भाग आहे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पहिल्या दिलेल्या हप्त्याच्या बेस वरती सुद्धा पीक विमा वितरित केला जाऊ शकतो केला जाणं अपेक्षित आहे

परंतु अद्याप केलेला नाही जर तसे काही अपडेट आले तर पीक विम्याच्या संदर्भातील देखील आपण खात्रीदायक अपडेट नक्की घेऊ परंतु सध्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा वितरणाची तयारी सुरू केलेली आहे एक खात्रीदायक या ठिकाणी अपडेट आहे तर मित्रांनो अशा प्रकारची काही महत्त्वाची अशी अपडेट होती

Leave a Comment

WhatsApp Logo आमचा WhatsApp ग्रुप Join करा