मित्रांनो राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजने अंतर्गत दुधाळ गाई . वाटप, शेळीमडी पालन, याचबरोबर कुकुट पक्षांचे पालन अशा विविध बाबींकरता अनुदानाचा लाभ दिला जातो.
आणि याच नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत राबवली जाणारी एक महत्त्वाची बाब म्हणजे हजार मांसल कुकुट पक्षांचं पालन. याच योजनेबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो, नावीन्यपूर्ण योजनेचे अर्ज कसे भरायचे, याच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या बाबीसाठी अनुदान याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेत आहोत. यामधील कुकुट पक्षांचे पालन या बाबीबद्दल देखील मोठ्या प्रमाणात विचारले जात आहे.
मित्रांनो, या योजने अंतर्गत आपण जर पाहिलं तर लाभार्थ्याला हजार मांसल कुकुट पक्षांचे पालन करण्यासाठी जे काही सुविधा आहेत त्यासाठी अनुदान दिलं जातं. प्रकल्प खर्च ग्राह्य धरून ५० ते ७५ टक्के पर्यंत अनुदान या योजने अंतर्गत दिलं जातं.
यामध्ये अत्यल्प भूधारक शेतकरी (ज्यांची एक हेक्टर पर्यंतची जमीन आहे), अल्पभूधारक शेतकरी (एक ते दोन हेक्टर पर्यंत जमीन), सुशिक्षित बेरोजगार, महिला, बचत गटातील लाभार्थी, वैयक्तिक महिला लाभार्थी अशा लाभार्थ्यांना प्राधान्य दिलं जातं.
मित्रांनो, या हजार मांसल कुकुट पक्षांचे पालन करत असताना लाभार्थ्याला स्वतःची किंवा भाडेपट्ट्याने जमीन असणं आवश्यक आहे. स्वतःची जमीन असेल तर सातबारा, भाडेपट्टा असेल तर करारनामा आवश्यक आहे.
याचबरोबर, हजार मांसल कुकुट पक्षांसाठी पाण्याचे टाके, निवासाची सोय यांचा सर्व प्रकल्प खर्च २ लाख रुपये ग्राह्य धरला जातो. खाद्याचे, पाण्याचे भांडी, ब्रुडर इत्यादीसाठी २५ हजार रुपये असा एकूण प्रकल्प खर्च २.२५ लाख रुपये धरला जातो.
यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना ७५ टक्के अनुदान दिलं जातं. म्हणजेच १,६८,७५० रुपयांचे अनुदान आणि लाभार्थ्याचा हिस्सा ५६,२५० रुपये भरावा लागतो.
ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना ५०% अनुदान मिळते. २.२५ लाखांच्या प्रकल्प खर्चासाठी १,१२,५०० रुपये अनुदान मिळते आणि १,१२,५०० रुपये स्वतःचा हिस्सा भरावा लागतो.
मित्रांनो, यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे:
- फोटो
- ओळखपत्राची सत्यप्रत
- जमिनीचा सातबारा / भाडेपट्टा करारनामा
- अपत्याचा दाखला (तीन पेक्षा जास्त अपत्य नसल्याचे स्वयंघोषणापत्र)
- आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खात्याचे पासबुक
- रेशन कार्ड
- कुटुंब प्रमाणपत्र
- संमतीपत्र (जर जमीन कुटुंबातील दुसऱ्याच्या नावावर असेल तर)
- दारिद्र्यरेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र (जर तसा अर्ज असेल तर)
- दिव्यांग प्रमाणपत्र (जर तसा अर्ज असेल तर)
- बचत गटाचे पासबुक (जर अर्ज बचत गटाच्या वतीने असेल तर)
- जन्मतारखेचा पुरावा
- शैक्षणिक पात्रतेचा दाखला
- बेरोजगारी नोंदणी (स्वयंरोजगार कार्यालयाची)
- प्रशिक्षण घेतले असेल तर त्याचा दाखला
तर अशा प्रकारचे कागदपत्रे आणि अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिलं जातं.
यासंदर्भात ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली आहे. तुम्ही अजून अर्ज केलेला नसेल तर मुदत गेलेली नाही, अर्ज करू शकता.
याव्यतिरिक्त काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा, त्याबद्दल सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू.
भेटूया नवीन माहितीसह आणि नवीन अपडेटसह. धन्यवाद