कृषी समृद्धी योजना : 25 हजार कोटीचा निधी शेतकऱ्यांच्या हाती

कृषी विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या महत्वकांशी कृषी समृद्धी योजनेतून कोट्यावधी रुपयांचा निधी थेट गाव पातळीवर शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाचवा चा तसेच नैसर्गिक संकटामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी कृषी समृद्धी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे पुण्यामधील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद श्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समृद्धी योजनेची आढावा बैठक गुरुवारी दिनांक 25 पार पाडली आहे

या बैठकीला कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी कृषी आयुक्त सुरज पांढरे पोखरा टप्पा 2 चे प्रकल्प संचालक परीमल सिंग महाराष्ट्रामधील राज्य कृषी विभाग उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश गोदावले महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक वर्षा लड्डा कृषी विभागाचे सर्व संचालक सर्वाधिक अधिकारी उपस्थित होते दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की कृषी समृद्धी योजनेअंतर्गत दरवर्षी 5 हजार कोटी रुपयांची भांडवल गुंतवणूक केली जाणार आहे व 5 वर्षात 25 हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या कृषी योजनेसाठी देण्यात येणार आहे

अंमलबजावणीवर चर्चा

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा उभारणे तसेच उत्पादकता वाढवणे पीक विविधीकरण करणे अन्नसाखळी बळकट करणे हवामान अनुकूल व शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढ घडवून आणणे या महत्वाच्या मुद्द्यावर सखोल चर्चा करण्यात आली त्याचबरोबर योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने या उपयोजना करण्याचे आदेश कृषिमंत्री भरणे यांनी दिले आहे

Leave a Comment