शेतकर्यांकरिता पीक पाहण्याची मुदत 30 सप्टेंबरला संपत असल्याने तिला एक महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आता पीक पाहणी 31 ऑक्टोंबर पर्यंत केली जाईल राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टी आणि दुबारा पेरणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या पीक पाहणी साठी कालावधी आधीच दोन आठवड्यांनी वाढण्यात आला होता आता त्याला एक महिन्याची पुन्हा मुदतवाढ देण्यात आली
खरीप हंगाम 2025 साठी सध्या शेतमालाला मध्ये पीक पाहणी होत असून दिनांक एक ऑगस्ट 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत शेतकऱ्यांकडून व त्यांच्या नंतर दिनांक 15 सप्टेंबर 2025 ते दिनांक 29 ऑक्टोंबर 2025 या कालावधीमध्ये सहाय्यक स्तरावरून ई- पीक पाहणी करण्याचे निर्देश करण्यात आले होते तथापि शेतकऱ्यांना पीक पाहणी चा कालावधी दोन आठवडे वाढवून देण्यात आला आहे राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी तसेच परत पेरणी या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही मुदतवाढ देण्यात आवश्यक होती
आता दिनांक 30 सप्टेंबरला शेतकऱ्यांची पीक पाहणी मुदत संपत आहे त्यानंतर उर्वरित एका महिन्यामध्ये सहाय्यकाद्वारे उर्वरित सर्व शेतकऱ्यांचे पीक पाहणी पूर्ण करणे आवश्यक आहे याबाबत कृषी विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात याबाबत सविस्तर सूचना देण्यात आले आहेत