Kharif sowing Maharashtra update : राज्यामध्ये 12 लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण

राज्यामध्ये विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाल्याने आतापर्यंत 11.70 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या असून अशी माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली तसेच खरीप हंगामाला प्रारंभ मिळाल्यानंतर खताची मागणी वाढू शकते

त्यामुळे सर्व प्रकारच्या खताचा साठा सुनिश्चित ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे बैठकीत कृषी विभागाने अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी खरीप हंगामा बाबत सादरीकरण केले त्यानुसार गेल्या वर्षीच्या अंतिम पेरण्या क्षेत्रामध्ये क्षेत्राच्या तुलनेत यंदा 8% टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून अनेक भागात सध्या पूर्व मशागतीचे कामे सुरू आहेत काही जिल्ह्यात पावसाची सातत्याने झालेली जोरदार बॅच पेरण्या खोळंबल्या आहे

पावसा करीता जिल्हानिहाय आकडेवारी

  1. शंभर टक्क्याहून अधिक पाऊस: अहिल्यानगर पुणे सोलापूर छत्रपती संभाजी नगर सांगली आणि धाराशिव
  2. 75 ते 100 टक्के पाऊस: रत्नागिरी-सिंधुदुर्ग जळगाव धुळे सातारा कोल्हापूर जालना आणि लातूर
  3. 50 ते 75 टक्के पाऊस : ठाणे रायगड नाशिक नांदेड परभणी हिंगोली आणि बीड
  4. 25 ते 50 टक्के पाऊस: बुलढाणा पालघर अकोला वाशीम अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली
  5. 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस : नागपूर वर्धा नंदुरबार गोंदिया भंडारा रस्तोगी यांनी यावेळी सांगितले की मराठवाडा आणि विदर्भातील भागात येत्या दोन ते चार दिवसांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे

जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितले की राज्यातील बहुतांश धरणात पाणीसाठा समाधानकारक आहे कर्नाटकातील अलीमट्टी धरणात 515 मीटर पातळीपर्यंत साठा राखण्याबाबत सहमती मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment