धान – मका पिकांमुळे खरीप 2025 -26 मध्ये 1713 लाख टनांहून अधिक उत्पन्नाची शक्यता

देशात यंदाच्या खरीप अन्नधान्य उत्पन्नाबाबत उत्साहाचे वातावरण आहे पीक वर्ष 2025 26 जून जुलै मध्ये खरीप पिकांचे उत्पादन सरकारने निश्चित केलेले आहे 1713. 9 लाख टन सहजपणे पार करू शकते अशी माहिती कृषी आयुक्त पी.के सिंह यांनी दिली आहे पेरणी खालील क्षेत्र फळांमधील वाढ आणि मान्सूनचा अनुकूल पाऊस यामुळे उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे असे त्यांनी सांगितले

PTR या वृत्तसंस्थेशी बोलताना सिंग म्हणाले की खरीप हंगामात काही भागात पूर व मुसळधार पावसामुळे नुकसान झाले असेल तरी पिकांचे झालेले नुकसान एकूण पेरणीच्या अल्प आहे धान व मका पिकांच्या क्षेत्रफळात झालेल्या वाढीमुळे सरासरी 1095 लाख हेक्टर च्या तुलनेत यंदा 1 हजार शंभर लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रत खरीप पेरणी झाली आहे कृषी आयुक्तांनी स्पष्ट केले की तेलबिया आणि कडधान्याच्या डाळी बाबत पेरणीचे क्षेत्र थोडे कमी राहिले असले तरी पिके चांगल्या स्थितीत आहे आणि त्याची उत्पादकता अधिक राहण्याची शक्यता आहे यामुळे एकूण उत्पादन चांगले राहण्याची शक्यता आहे

Leave a Comment