जॉब कार्ड काढा आत्ता आपल्या मोबाइल वर Get a job card now on your mobile

मित्रांनो, बऱ्याच जणांचा एक सामान्य प्रश्न असतो – जॉब कार्ड कसं काढावं job card download maharashtra ?

सध्या घरकुल योजनेचे फॉर्म सुरू आहेत आणि त्यासाठी जॉब कार्ड आवश्यक आहे. भविष्यात येणाऱ्या इतर अनेक योजनांसाठीही हे कार्ड लागण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, घरकुल योजनेसाठी जॉब कार्ड नंबर मागितला जातोय, म्हणून आजच्या आपण बघणार आहोत:

  • जॉब कार्ड कसं काढावं
  • कोणती कागदपत्रं लागतात
  • आणि जॉब कार्ड आधीच असेल तर ते कसं डाऊनलोड करायचं

job card maharashtra list जॉब कार्ड कसं काढायचं?

खूप जण विचारतात की जॉब कार्ड ऑनलाईन निघतं का?

➡️ जॉब कार्ड ऑनलाईन निघत नाही.
हे ग्राम रोजगार सेवक किंवा ग्रामसेवक यांच्या माध्यमातून मिळतं.

तुम्हाला एक ‘नमुना एक’ नावाचा फॉर्म भरून द्यावा लागतो आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रं जोडायची असतात.
हा फॉर्म मी या ठिकाणी दिला आहे, किंवा स्क्रीनवरही दाखवतो आहे.


लागणारी कागदपत्रं:

  1. फॉर्म ‘नमुना एक’ – व्यवस्थित पेनाने भरलेला
  2. आधार कार्ड – घरातल्या सर्व 18+ वयाच्या व्यक्तींचं
  3. रेशन कार्ड
  4. बँक पासबुकची झेरॉक्स
  5. 4×6 साईजचा कुटुंबाचा फोटो (सायबर कॅफेमधून काढलेला फोटो योग्य)

ही सर्व कागदपत्रं फॉर्मसोबत जोडून, ग्रामसेवकाकडे जमा करायची आहेत.
ग्राम रोजगार सेवक काही वेळा लगेचच जॉब कार्ड नंबर देतात, नाहीतर 5-10 दिवसांत मिळतो.


आधीच जॉब कार्ड असेल तर – कसं डाऊनलोड करायचं?

  1. या ठिकाणी क्लिक करा
  2. तुमचा जिल्हा, तालुका (ब्लॉक) आणि ग्रामपंचायत निवडा
  3. खाली स्क्रोल करा –
    • “Job Card Employment Register” या ऑप्शनवर क्लिक करा
  4. तुमच्या गावातील सर्व जॉब कार्ड्सची यादी दिसेल
  5. तुमच्या नावावर किंवा जॉब कार्ड नंबरवर क्लिक करा
  6. जॉब कार्ड डाऊनलोड करा किंवा सेव्ह करून ठेवा

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment