महात्मा फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वकांक्षी आरोग्य योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मोफत उपचार आणि आर्थिक भार न लागता हॉस्पिटल सुविधा पुरवणे आहे या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत वैद्यकीय तपासणी तसेच उपचार शस्त्रक्रिया आणि औषधे मिळतात खास करून अशा व्यक्तींना लाभ होतो त्याची आर्थिक क्षमता कमी आहे आणि ज्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये खर्च करणे परवडत नाही
योजना कोणा करिता आहे
योजना मुख्यता महाराष्ट्र राज्यातील गरीब व मागासवर्गीय आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल वर्गांच्या लोकांसाठी आहे त्यासाठी काही निवडक अटी आहेत
| लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा |
| या योजनेचा लाभ घेणाऱ्या चे वार्षिक उत्पन्न ठराविक आणि मर्यादित जास्त नसावे |
| कुटुंबातले सर्व सदस्य योजनेत समाविष्ट केले जातात |
योजनेमध्ये मिळणाऱ्या सुविधा
महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणाऱ्या सुविधा खालीलप्रमाणे आहेत
मोफत हॉस्पिटल उपचार सरकारी तसेच काही निवडलेल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार ऑपरेशन व शस्त्रक्रिया हृदय करडी अजायो डेंटल नेत्र संबंधित यासारखे उपचारांसाठी आर्थिक मदत औषधी व तपासण्या व उपचार संबंधित औषधी व चाचण्या मोफत मिळतात गर्भवती महिला व लहान मुलांसाठी सुविधा प्रसूती संबंधित तपासण्या लसीकरण व औषधी मोफत आर्थिक मदत गंभीर आजारासाठी हॉस्पिटलमध्ये खर्चाचा काही भाग शासनाद्वारे भरला जातो
Government Health Beneflts Maharashtra महत्त्वाचे लाभ
गरीब कुटुंबांना मोठा आधार ठरतो आरोग्यसेवा सर्वांसाठी सुलभ होते गंभीर आजाराचे उपचार लवकर आणि सुरक्षित पद्धतीने होतात सामाजिक न्यायाची भावना वाढते
योजनेकरिता अर्ज कसा करावा
योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना खालील स्टेप्स फॉलो करावे लागतील निवडलेल्या हॉस्पिटल तसेच जन आरोग्य केंद्राला भेट द्या राज्य सरकारच्या यादीतील हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा भेट द्या
आवश्यक कागदपत्रे जमा करा
- आधार कार्ड किंवा ओळखपत्र
- उत्पन्नाचा प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
अर्ज फार्म भरा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध फार्म भरावा लागतो लाभ मिळाल्यानंतर उपचार सुरु अर्ज मंजूर झाल्यावर उपचारासाठी वेळ ठरवला जातो
योजना सध्या चालू आहे का?
हो महात्मा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र राज्यात सध्या चालू आहे सरकारी वेबसाईटवर किंवा स्थानिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन तुम्ही योजनेची लाभार्थ्यासाठी अर्ज करू शकता
निष्कर्ष : महात्मा फुले जन आरोग्य योजना ही गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांकरिता ही एक जीवन संगोपन करणारी योजना आहे या योजनेमुळे नागरिकांना उच्च दर्जाची व आरोग्य सेवा मोफत मिळते आणि आर्थिक ताण कमी होतो सामाजातील आरोग्य स्थिती सुधारते ही योजना केवळ आरोग्य सेवापुर्ती असे नाही तर गरिबांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यास मदत करते त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गात येत असेल तर ही योजना नक्कीच वापरावी
आपल्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी आरोग्य महत्त्वाचे आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्या आणि आरोग्य सुरक्षित ठेवा हा लेख ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी नक्की शेअर करा





