अटल पेन्शन योजना ही असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे या योजनेत 18 ते 40 वयोगटातील कोणत्याही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो दरमहा ठराविक रक्कम भरावी निवृत्तीनंतर 1000 ते 5000 पर्यंत पेन्शन मिळते योजनेत प्रधानमंत्री जनधन खाते असणे आवश्यक आहे आणि योगदान स्टेट बँक खात्यातून आटो डेबीट होतं सदस्याचा मृत्यूनंतर कुटुंबाला देखील लाभ मिळतो सध्या ही योजना देशभर सुरू आहे आणि लाखो लोकांनी नोंदणी केली आहे फायदे निश्चित पेन्शन सरकारकडून हमी दर रक्कम आणि आर्थिक सुरक्षितता शेतकरी मजदूर तसेच लघुउद्योग कामगारांसाठी योजना निवड चा आधार आहे
भारत सरकारने सुरू केलेली पेन्शन योजना (Atal Pension Yojana) ही असंघटित क्षेत्र काम करणाऱ्या लोकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची व उपयुक्त योजना आहे आजच्या काळात बहुतांशी भागात कामगार शेतकरी छोट्या उद्योगात काम करणारे बांधकाम मजूर महिला कामगार त्यांच्याकडे निवृत्ती नंतरचा आर्थिक आधार नसतो हीच गरज ओळखून ही योजना 2015 मध्ये सुरु करण्यात आली
अटल पेन्शन योजना म्हणजे काय
अटल पेन्शन योजना ही निवृत्तीनंतर मासिक पेन्शन बनवून देणारे सरकार योजना आहे या योजनेत सहभागी झालेल्या नागरिकांना वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 1 हजार 5 हजार इतकी पेन्शन मिळते या पेन्शनची रक्कम आपण भरलेल्या मासिक योगदानावर आणि योजनेत घेतलेल्या वयावर अवलंबून असते
कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतो
- अर्जदार भारतीय नागरिक असावा
- वय 18 ते 40 दरम्यान असावी
- अर्जदाराकडे बँक किंवा जनधन खाते असणे आवश्यक आहे
- अर्जदार कोणत्याही इतर सरकारी पेन्शन योजनेचा सदस्य नसावा
योजना विशेष शेतकरी बांधव, मजूर,हमाल, ड्रायव्हर,घरकाम करणारी महिला लघु उद्योग कामगार तसेच असंघटित क्षेत्रात काम करणारे सर्व नागरिकांसाठी योजना खुली आहे
पीएम किसान योजना नवीन नोंदणी कशी करायची
सातबारावर नोंद झाली आहे का नाही ते पहा पिक विमा
या शेतकऱ्यांसाठी मदत वितरित सुरू
अटल पेन्शन योजनेत शामिल होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, बँक खाते, जनधन खाते असणे उत्तम, मोबाईल नंबर, ओळखपत्र, फोटो
नोंदणी कशी करावी
जवळच्या बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जा तेथे अटल पेन्शन योजनेचा अर्ज फार्म भरा आधार कार्ड खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर द्या दरमहा किती पेन्शन आहे हे ठरवा 1000 ₹ 2000 ₹3000 ₹4000 किंवा ₹5000 त्यानुसार मासिक योगदान आपोआप बँकेतून वाजा होईल
मासिक योगदान किती करावे लागते
- मासिक योगदान हे वय आणि निवडलेल्या पेन्शन रकमेवर अवलंबून असते उदाहरण जर आपण अठराव्या वर्षी सामील झाला तर 1 हजार पेन्शन वावी असेल तर दरमहा फक्त 42 भरावे लागतात
- आणि पाच हजार पेन्शन साठी 18 वर्ष सामील झाल्यास 210 रुपये दरमहा वय झाल्यास योगदान वाढते
अटल पेन्शन योजनेचे प्रमुख फायदे
- निश्चित मासिक पेन्शन वयाच्या साठ वर्षानंतर आयुष्यमान भारत दरमहा ₹1000 ते ₹5000 पर्यंत पेन्शन
- कुटुंबासाठी सुरक्षा सदस्यांच्या मृत्यूनंतर पत्नी किंवा पतीला त्याचा प्रमाणे पेन्शन मिळते
- आर्थिक स्थैर्य वृद्धपाकळात स्थिर उत्पन्न मिळते
- सरकारकडून हमी दर योजना गुंतवणुकीला सरकारचे हमी
- टॅक्स सवलत आयकर कलम 80CCD अंतर्गत करसवलत मिळू शकते
मृत्यूनंतर काय होते
सदस्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जोडी दाराला पेन्शन सुरू राहते दोघी निधन पावल्यानंतर एकूण जमा रक्कम नाम निर्देशक व्यक्तीला Nominee दिली जाते म्हणजेच ही योजना फक्त सदस्यांसाठी नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी संरक्षण देते
अटल पेन्शन योजनेत उदाहरण : समजा मदन नावाचा शेतकरी 30व्या वर्षी या योजनेत सहभागी होतो आणि दरमहा 577 भरतो तर त्याला 60 वर्षानंतर दरमहा पाच हजार पेन्शन मिळते म्हणजे त्याने सुमारे 30 वर्षे योगदान दिल्यानंतर वर्धपाकाळात स्थिर उत्पन्न मिळते
योजना रद्द केल्यास काय होईल
जर कोणत्याही कारणाने योजना बंद करायचे असेल तर सदस्य साठ वर्षांपूर्वी पैसे काढू शकतो मात्र त्यावेळी काही कापत होऊ शकते सरासरी नियमांनुसार केवळ खालील परिस्थितीत पूर्ण पैसे परत मिळतात १ मृत्यू गंभीर २आजार ३कायमस्वरूपी अपंग
योजने बद्दल काही महत्वाच्या सूचना
प्रत्येक महिन्यात योगदान वेळेवर भरले गेले पाहिजे जर हप्ता हप्ता चुकला तर काही दंड आकारला जाऊ शकतो बँक खाते सक्रिय ठेवणे आवश्यक आहे मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला असावा
अटल पेन्शन योजना कुठे सुरू आहे
ही योजना संपूर्ण भारतात सुरू आहे आणि सर्व बँक पोस्ट ऑफिस तसेच (सीएससी) common Service Centre केंद्रावर उपलब्ध आहे महाराष्ट्रात सुद्धा या योजनेत लाखो लोक सहभागी झाले आहेत
निष्कर्ष : आजच्या महागाईच्या काळात निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न असणं खूप महत्त्वाचा आहे अटल पेन्शन योजना एक गरीब आणि मागासवर्गीय नागरिकांसाठी नवीनच सुरक्षाकवच आहे थोडा मासिक योगदान देऊन आपण व आपल्या कुटुंबासाठी भविष्याची खात्रीशीर तयारी करू शकतो म्हणूनच आजच्या आपल्या जवळच्या बँकेत आणि अटल पेन्शन योजनेत सामील व्हा योजना तुमच्या वृद्धपाकळ्यात आयुष्य निर्धार आणि सन्मानाने जगण्यासाठी उपयुक्त ठरेल





