राज्यातील शेतकऱ्यांना अचूक हवामान माहिती व त्यावर आधारित कृषी सल्ला मिळावा यासाठी केंद्र शासनाच्याविडोज प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे
या पार्श्वभूमीवर महावेध प्रकल्पास पुढील पाच वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे सध्या महसूल मंडळ स्तरावर महावेध अंतर्गत अनेक स्वयंचलित हवामान केंद्र कार्यरत असून तापमान पर्जन्यमान आद्रता वाऱ्याचा वेग व दिशा यासारख्या हवामान घटकाची माहिती गोळा केली जाते
ही माहिती आपत्ती व्यवस्थापन कृषी संशोधन आणि विमा योजनेमध्ये उपयोगी ठरते आहे प्रकल्पांतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील नवे केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत ज्या गावांमध्ये यापूर्वीच केंद्र आहेत त्यांना वगळले जाणार आहे यामुळे गाव पातळीवर अधिक सूक्ष्म आणि अचूक हवामान निरीक्षण शक्य होईल
याचा फायदा गारपीट दुष्काळ पूर यासारखे नैसर्गिक आपत्तीच्या पूर्व संसार करीन साठी होणार आहे या प्रकल्पाची अंमलबजावणी वेदर सर्व्हिसेस प्रणाली या खाजगी कंपनी मार्फत करण्यात येणार असून कृषी विभाग नोडल विभाग म्हणून कार्य करणार आहे महावेद मधील माहितीचा वापर प्रधानमंत्री पिक विमा योजना हवामान आधारित फळपीक विमा योजना आधीचा समावेश केला जातो