Gas Subsidy 2025 केंद्र सरकारची या महिलांना रक्षाबंधनाची भेट गॅस अनुदान

मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील करोडो महिला लाभार्थ्यांसाठी रक्षाबंधनाच्या पूर्वसंधेलाच एक खुशखबर देण्यात आलेली आहे. Gas Subsidy मित्रांनो, 8 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एक मोठी भेट देण्यात आलेली आहे.

मित्रांनो, प्रधानमंत्री उज्वला योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 12 हजार कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. एकंदरीत पाहिलं तर देशभरामध्ये या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत. याच्या अंतर्गत गॅस कनेक्शन असलेल्या 10.33 कोटी महिला लाभार्थ्यांना आता अनुदानाचा लाभ मिळणार आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत सरकार एका वर्षामध्ये 14.2 किलो वजनाच्या नऊ सिलेंडरच्या खरेदीवर प्रति सिलेंडर 300 रुपये एवढं अनुदान देते. हेच अनुदान वितरित करण्यासाठी केंद्र शासनाने 12 हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे. या योजनेत पहिल्या कनेक्शनवेळी गॅस कनेक्शन अर्थात गॅस स्टोव्ह आणि सिलेंडर दिला जातो आणि त्यानंतर प्रत्येक सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी मिळते. वर्षाला नऊ सिलेंडरपर्यंत ही सबसिडी दिली जाते.

Gas Subsidy याच्यासाठी 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 12 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे 10 कोटी 33 लाख महिला लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. राज्यामधून साधारणपणे 52 लाखांपेक्षा जास्त लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्र होणार आहेत.

मित्रांनो, याचबरोबर राज्यशासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबवली जाते. लवकरच या योजनेच्या संदर्भातील देखील निर्णय घेतला जाईल. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिला लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातात. प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या आणि लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना हे तीन सिलेंडर वार्षिक मोफत मिळतात.

त्याबद्दल देखील अपडेट आल्यानंतर आपण लवकरच माहिती जाणून घेऊ. अशाप्रकारे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्त्वाची अशी भेट महिला लाभार्थ्यांना देण्यात आलेली आहे. धन्यवाद.

Leave a Comment