राज्यातील शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला मूर्त स्वरूपात देण्याचे ठरवले असून डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील 80 टक्के शेतकऱ्यांना वर्षभर बारा तास मोफत वीज देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम ते बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले शेतीसाठी बारा तास वीज ही राज्यातील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षाची मागणी होती या मागणीची गंभीर दखल घेत
राज्य शासनाने तात्काळ अंमलबजावणी सुरू केली असून डिसेंबर 2026 पर्यंत शेतकऱ्यांना 80 टक्के शेतकऱ्यांना दररोज 12 तास मोफत वीज दिली जाणार आहे मुख्यमंत्र्यांनी आता सांगितले की 2025 ते 2030 या कालावधीत राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहकांचे वीजदर दरवर्षी कमी करण्याचे नियोजन सुरू केले आहे याशिवाय 300 युनिटपर्यंत हेच वापरणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सौरऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज दिली जाणार आहे
सिंचन आणि रोजगारावर भर देताना फडणवीस म्हणाले की वर्धा जिल्ह्यातील लोहार वर्धा वाडोणा पिंपळखुटा यासारख्या सिंचन प्रकल्पामुळे शेतीला पाणी व वीज उपलब्ध होईल तसेच समृद्धी महामार्गावरील नोडवर MIDC विकसित करून स्थानिक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल