शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती फेक फार्मर आयडी कार्ड पासून सावधान रहा मित्रांनो सध्या राज्यासह देशातील शेतकऱ्यांची सरकारी पोर्टलवर नोंदणी सुरू आहे या नोंदणी च्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याचा डिजिटल फार्मर आयडी नंबर तयार केला जात आहे मात्र या प्रक्रिया बाबत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे प्रकार समोर येत आहे
फार्मर आयडी म्हणजे काय
शेतकऱ्यांच्या जमिनी ची माहिती आणि आधार कार्ड लिंक करून डिजिटल फार्मर आयडी नंबर तयार केला जातो हा नंबर शेतकऱ्याचा युनिक ओळख क्रमांक आहे सध्या या फार्मर आयडी नंबर शिवाय कुठलाही फिजिकल कार्ड उपलब्ध नाही फेक फार्मर आयडी कार्ड ची फसवणूक काही संस्था व सीएससी सेंटर च्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितले जात आहे की आपल्या वेगवेगळे Farmer ID कार्ड बनवून मिळेल आणि ते योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा कर्जासाठी लागेल यासाठी शेतकऱ्यांकडून 100 ते 200 रुपये घेतले जाते आहेत आणि त्यांची गोपीनेती माहिती आधार नंबर मोबाईल नंबर जमिनीची माहिती गोळा केली जात आहे प्रत्यक्ष अशाप्रकारे कुठलाही कार्ड सरकारकडून जारी केलेले नाही त्यामुळे हे सर्व कार्ड फेक व बोगस आहेत
शासनाचा इशारा
कृषी आयुक्त सर्व जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना पत्र पाठवण्यात आले आहे की त्यात स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत ती सध्या फक्त डिजिटल farmer ID नंबर मान्य आहे कुठल्याही प्रकारची कार्ड वैद्य (valid) नाही शेतकऱ्यांनी आपली गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये अशा फसवणु बाबत जनजागृती करणे आवश्यक आहे
शेतकऱ्यांनी काय करावे
फक्त अधिकृत एग्रीटेक पोर्टल केलेल्या नोंदणी मधून मिळालेल्या डिजिटल farmer ID नंबर वापरावा कोणालाही तुम्हाला कार्ड बनवून देण्याचे आमिष दाखवत असेल तर पैसे देऊ नये अशा प्रकारच्या फेक वेबसाईट व लोकांपासून सावधान राहा शासनाकडून अधिकृत फार्म आयडी कार्ड उपलब्ध होतील याबाबतची माहिती थेट शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कृषी विभागामार्फत दिली जाईल
निकष : सध्या शेतकऱ्यांना फक्त डिजिटल परमनंट आयडी नंबर एक गरजेचा आहे कुठलाही प्रकारचा कार्ड साठी पैसे देऊ नका अशा काही शासकीय योजनेमध्ये उपयोग होणार नाही भविष्यात जर फार्म आयडी कार्ड जारी झाले तर शासन त्याची माहिती जारी करते शेतकरी बांधवांनी प्रकल्प आपली माहिती सुरक्षित ठेवा आणि फसवणूक पासून वाचवा