पिक विमा जामा होनार Crop Insurence

नमस्कार शेतकरी बांधवांनो, 2022 पासून ते 2024-25 पर्यंत म्हणजेच रब्बी हंगामापर्यंतचा सर्व थकीत पीक विमा मिळणार आहे. सोमवार, दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी पहिला हप्ता दिला जाणार आहे.

जे लाभार्थी क्लेम केलेले आहेत, अशा सर्वांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम राजस्थान येथून थेट डीबीटी मार्फत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे. अशी माहिती स्पष्टपणे देण्यात आलेली आहे.

ज्यांचे दावे पूर्ण झाले होते, अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. काहींना 25% आगाऊ पीक विमा मिळालेला होता, तर 75% थकीत विमा बाकी होता. तसेच, अनेक लाभार्थ्यांना 2022 पासून पीक विमाचा एकही रुपया मिळालेला नव्हता. त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा आहे.

आता इथून पुढे दरवर्षी फक्त तीन टप्प्यांमध्ये थेट डीबीटी मार्फत पैसे वितरीत केले जाणार आहेत. प्रत्येक राज्यांच्या माध्यमातून ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे.

11 ऑगस्ट 2025 रोजी पीक विमाचे पैसे अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निश्चित जमा होतील. हा दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवा.

Leave a Comment