पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनेसाठी पशुपालक शेतकरी सुशिक्षित बेरोजगार युवक व महिला एक जून 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन पशुधन संवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशी गट वाटप करणे शेळी गट वाटप करणे 1000 मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसहाय्य देणे व शंभर कुक्कुट पिल्लांचे वाटप व 25 अधिक तीन तलंगा गट वाटप या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2025-26 या वर्षात राबवली जाणार
इच्छुकांनी या संकेतस्थळावर https://ah.mahabms.com/ किंवा AHMAHABMS मोबाईल ॲप द्वारे अर्ज करावा अर्ज करताना दूध व्यवसाय कुक्कुटपालन किंवा शेळीपालन यापैकी स्वतंत्रपणे निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
अर्ज भरतांना नोंदवल्या मोबाईल क्रमांकावरच अर्जाच्या स्थितीबाबत चे संदेश पाठवले जाणार असल्याचे अर्जदाराने कोणत्याही स्थितीत मोबाईल नंबर बदलू नये योजनेची पूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धत याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲप वर उपलब्ध आहे
या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असल्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा अर्जदाराने नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठवण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्ज केल्यानंतर आपला मोबाईल नंबर बदलणार नाही याची दक्षता घ्यायची आहे
असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपयुक्त डॉक्टर अंकुश परिहार यांनी केले आहे त्याचबरोबर अधिक माहितीसाठी 1965 किंवा 188-233 -0418 या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्या चे पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपयुक्त कार्यालय तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वच चालय अथवा नजदीकच्या पशु वैद्यकीय केंद्राशी संपर्क साधावा असेही त्यांनी पत्रकारत म्हटले आहे
पशुसंवर्धन योजनेच्या लाभासाठी अर्जदाराने एखाद्या योजनेकरीता एखादा अर्ज केल्यानंतर दरवर्षी पुन्हा अर्ज करावा लागू नये यासाठी तयार केलेले प्रतीक्षा यादी पुढील पाच वर्षापर्यंत लागू करून ठेवण्याची सोय केलेली आहे त्यामध्ये 2021-22 पासून पुढील पाच वर्षे म्हणजेच 2026 पर्यंत लागू ठेवण्याची सोय आहे त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढले असून त्याची प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे किंवा लाभ मिळेल ही माहिती कळू शकेल सहाजिकच त्यांना लाभार्थी हिस्सा रक्कम भरणे किंवा इतर बाबीचे नियोजन करता येणे शक्य आहे