खरीप हंगाम 20 25 26 करता कापसाच्या बियाण्याच्या भावामध्ये वाढ झालेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती अपडेट आजच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो प्रत्येक हंगाम सुरू होत असताना कापसाच्या बियाण्याचे दर हे केंद्र शासनाच्या माध्यमातून निश्चित केले जातात आणि अशाच प्रकारे 202526 करता केंद्र शासनाच्या माध्यमातून एक राजपत्र निर्गमित करून 202526 च्या खरीपा हंगामासाठीचे कापसाच्या बियाण्याचे दर निश्चित करण्यात आलेले आहेत
ज्याच्यामध्ये 202425 च्या दरामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे. मित्रांनो याच्यामध्ये cotton price increase कापसाच्या बियाण्याच जे पॅकेट आहे ते 475 g वजनाच असत आणि अशाच प्रकारे बोलगार्ड वन या व्हरायटीच्या 475 g च्या कापसाच्या बियाण्याच्या वजनाच्या पॅकेटसाठी 635 एवढा दर निश्चित करण्यात आलेला आहे
ज्याच्यामध्ये गेल्या वर्षी पेक्षा 27 रुपयाने वाढ करण्यात आलेली आहे. तर बोलगा टू च्या पॅकेटसाठी 901 रुपये एवढी किंमत निश्चित करण्यात आलेली आहे.
गेल्या वर्षी ₹864ला असलेल पॅकेट आता ₹901ला विकल जाणार आहे. अर्थात याच्यामध्ये सुद्धा प्रति पॅकेट ₹37ची वाढ करण्यात आलेली आहे. मित्रांनो खरीप हंगामाला अवघ्या 15 दिवसांमध्ये आता सुरुवात होणार आहे. राज्यामध्ये अनेक भागात कापसाची लागवड केली जाते आणि यावर्षी कापसाच क्षेत्र देखील वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय आणि याच्यामध्येच आता कापसाच्या बियाण्याचे दर वाढल्यामुळे बोगस बनावट बियाण्याच्या विक्रीची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.
मित्रांनो अनेक प्रकारे जसे की दारात येऊन थेट विक्री असेल ऑनलाईन पद्धतीने असेल असे बनावट बियाण्याची विक्री केली जाते आणि शेतकऱ्यांना त्याचा दर देखील कमी दिला जातो त्याच्यामुळे साहजिकच शेतकरी ते बियाणं खरेदी करण्याचा प्रयत्न करतात आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील होते.
मित्रांनो याच्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शासनाने ठरवलेल्या किमतीपेक्षा अधिक दर देऊ नये किंवा अधिकृत निविष्ट विक्री दुकानातूनच या बियाण्याची खरेदी करावी पक्की पावती घ्यावी अशा प्रकारच आव्हान करण्यात आलेल आहे.
तर मित्रांनो 2025-26 करताच्या कापसाच्या बियाण्याच्या दराच्या संदर्भातील हे एक महत्त्वाच अपडेट होत ज्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भेटूयात नवीन माहिती, नवीन अपडेट सह धन्यवाद.