नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम पवार फळबाग लागवड योजना सुरू झालेली आहे यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. यामध्ये नवीन नियमानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहणार आहे. यामध्ये दोन लाखापर्यंत अनुदान राहणार आहे परंतु लक्षात ठेवा जे अगोदर शेतकरी फॉर्म भरतील त्यांचा इथे अगोदर नंबर लागणार आहे.
आता यासाठी जर तुम्ही दोन लाखापर्यंत अनुदान म्हणत असाल तर ते कशा पद्धतीने राहील ते तुम्हाला या चार्टमध्ये पाहायला येईल. हे अर्ज सुरू झालेले आहेत. याचा अर्ज कसा भरायचाय या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे
आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं जे फळ पिक आहेत ते तुम्हाला या चार्टमध्ये दिसतील. हा जो चार्ट आहे याचा जो स्क्रीनशॉट आहे त्या काढून घ्या. हेक्टरी किती अनुदान आहे या चार्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हे सगळं एकदा चेक करून घ्या, सगळं पाहून घ्या.
फळबाग लागवड योजना ऑनलाइन अर्ज करा
आता याचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायच आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला अर्जदार लॉगिन करायचा आहे, ज्यामध्ये वैयक्तिक शेतकरी हा पर्याय निवडून शेतकरी आयडी विचारलाय. फार्मर आयडी टाकायचा आहे आणि ओटीपी पाठवावरती क्लिक करायचा आहे. फार्मर आयडी माहित नसेल तर खाली ऑप्शन दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून फार्मर आयडी आपला शोधू शकता.
तरी मी आता इथे फार्मर आयडी टाकतो आणि ओटीपी पाठवावरती क्लिक करतो. फार्मर आयडी टाकून ओटीपी पाठवा वरती क्लिक केल्यानंतर इथे प्रोसेसिंग होईल आणि आपल्या जो काही मोबाईल नंबरला फार्मर आयडी आहे लिंक त्या मोबाईलवरती ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी तुम्हाला तिथे टाकायचा. ओटीपी प्रविष्ट करा या बॉक्समध्ये आणि ओटीपी तपासा या पर्यायावरती क्लिक करायचा आहे.
ओटीपी तपासा पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे आपली प्रोफाईल इथे ऑटोमॅटिकली सगळी माहिती जी आहे ते इथे दाखवली जाईल. इथे आपली प्रोफाईल 100% आपण भरलेली आहे. तुम्ही भरली नसेल तर 100% ही प्रोफाईल करायची आहे. आता अर्ज करण्यासाठी डाव्या साईडला तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे “घटकासाठी अर्ज करा” या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे.
“घटकासाठी अर्ज करा” ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे भरपूर ऑप्शन तुम्हाला दिसतील. इथे खाली यायचं आहे आणि फलोत्पादन हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. फलोत्पाद मध्ये पाहू शकता भाऊसाहे फुणकर फळबाग लागवड योजना. त्याच्यासमोर “बाबी निवडा” या पर्यायावरती क्लिक करायचा आहे.
त्यानंतर आपला गट नंबर इथे सिलेक्ट करायचा आहे. सर्वेक्षण क्रमांक म्हणजेच गट नंबर. गट नंबर इथे निवडल्यानंतर आपल्याला घटकाचा प्रकार आता निवडायचा आहे. आता घटकाचा प्रकार यामध्ये आपण कोणता निवडायचा आहे ते पहा. इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत – “प्रकल्प” आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो “इतर घटक”. तर आपल्याला “इतर घटक” हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.

“इतर घटक” सिलेक्ट केल्यानंतर बाबी निवडायचे आहेत. बाबी आता कोणती येणार आहे त्यामध्ये बाग लागवड, फळे, फुले, मसाले हा ऑप्शन आहे. तर बाग लागवड वरती क्लिक करायच आहे. यामध्ये पुढे आल्यानंतर बाब निवडायची आहे. बाब आता निवडायची आहे. त्यामध्ये “निवडा” → “निवड करा” ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.
इथे आता फळ पिके हा ऑप्शन पहिलाच तुम्हाला दिसेल. फळ पिके हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. फळ पिके हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता योजना येईल. तर आता योजनेचे अर्ज सुरू झालेले ते आहे भाऊसाहेब फोडकर फळबाग लागवड योजना. तर भाऊसाहेब फुडकरचे जी काही योजना आहे ती इथे आपल्याला निवडायची आहे.
योजना निवडल्यानंतर आपल्याला पीक निवडायच आहे. आता तुम्ही कोणतं पीक घेणार आहात, जे काही फळ असेल, कोणतं पीक तुम्ही लावणार आहात ते पीक तुम्हाला इथे लिस्ट दिसेल – आंबा, काजू, नारळ, सीताफळ, अंजीर, पेरू, बदाम, फणस, जांभूळ, कागदी लिंबू, कोकम, संत्री, डाळिंब, चिकू, मोसंबी, चिंच इत्यादी.
ते ऑप्शन तुम्ही इथे निवडायचे आहे. समजा मी इथे आंबा निवडला, तुम्ही जे काही रोपं लावणार असाल ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. त्यानंतर आता पिकांमधील जे काही अंतर आहे ते पिकांमधील अंतर तुमचं 10/10 असणार आहे का 5/5 असणार आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे.
ते सिलेक्ट केल्यानंतर खाली यायचं आहे. आता फळबाग लागवडीसाठी जे काही तुम्ही क्षेत्र ठरवलेल आहे ते किती हेक्टरमध्ये आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. किती गुंट्यामध्ये तुम्ही या दुसऱ्या बॉक्समध्ये टाकू शकता – पहिल्या बॉक्समध्ये हेक्टरमध्ये, दुसऱ्या बॉक्समध्ये गुंट्यामध्ये असं टाकून तुम्हाला खाली “जतन करा” ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचा आहे.
क्षेत्र टाकताना व्यवस्थित टाका. तुम्हाला हा एरर येऊ शकतो. इथे पहा वरती तुम्ही पाहू शकता – समजा मी असं 0.10 केलं तर इथे एर येईल: “कोकण विभागात फळबाग लागवडीसाठी प्रस्तावित क्षेत्र 10 हेक्टरपेक्षा अधिक असता कामा नाही”. कोकण विभागात 10 हेक्टरच्या आतमध्ये पाहिजे अशी इथे माहिती दिलेली आहे.
ती एकदा वाचून घ्या. जे काही क्षेत्र असेल ते हेक्टर आणि गुंठ्यामध्ये टाका आणि खाली “जतन करा” ऑप्शन वरती क्लिक करा. आता मी आंबा टाकलाय तर इथे पहा, खाली आलेला आहे. अजून टाकायचं असेल तर इथे “S” वरती क्लिक करून तुम्ही अजून जे आहे ते रोपं टाकू शकता.
म्हणजेच इथे फळाची जी काही लागवड आहे, कोणती लागवड करणार आहात ते तुम्ही टाकू शकता. मी फक्त इथे आंबा टाकलेला आहे. ते इथे आंबा ऍड झालेला दिसेल. तुम्हाला अजून ऍड करायचं असेल तर तुम्ही त्याच पद्धतीने “बाबी निवडा” ऑप्शन वरती क्लिक करून जे काही बाब असेल ती तुम्ही इथे निवडू शकता.
ज्यामध्ये आपल्याला माहिती आहे – बाग लागवड, त्यामध्ये फळ पिकं, आणि फळ पिकामध्ये योजना आहे भाऊसाहेब फुंडकर. आणि यामध्ये भाऊसाहेब फुंडकर निवडल्यानंतर पीक निवडायला, तुम्ही जे काही लागवड करणार आहात ती लागवड इथे पीक निवडायचं आहे.
त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करून हे जतन करायच आहे. अशा पद्धतीने हे जतन होईल. जतन झाल्यानंतर आता आपल्याला अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी डाव्या साईडला आपल्याला यायच आहे आणि घटकासाठी अर्ज करायचा आहे. आता पुन्हा आपण येणार आहोत. हे असच इथे ठेवून पाठीमागे यायच. “घटकासाठी अर्ज करा” या पर्यायावरती क्लिक करायच आहे.
“अर्ज सादर करा” हा पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. “ओके” करायच आहे. पर्यायावरती क्लिक करायच आहे आणि इथे आपल्याला दिसेल आपण कोणकोणते जे काही लागवड करणार आहे ते इथे टाकलेला आहे.
त्यानंतर इथे आपल्याला या योजनेच्या अटीशरती मान्य करायची आणि पे्लिकेशन फीचा ऑप्शन येईल. काही जणांना पहिल्यांदाच भरत असाल तर पे्लिकेशन फी वरती क्लिक करायच आहे. पहिलाच अर्ज तुमचा असेल तर तुम्हाला इथे 23 रुपयाचा पेमेंट करायचा आहे. 23 रुपये भरायचे आहेत. इथे ऑप्शन दिला जाईल – “मेक पेमेंट” वरती क्लिक करायच आहे.
तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm ने ऑप्शनने इथे पेमेंट करू शकता. तर इथे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ऑप्शन निवडून, बारकोडने तुम्ही स्कॅन करून हे पेमेंट सक्सेसफुली झालेल आहे. पहिल्यांदा अर्ज करत असाल तर इथे पेमेंट लागेल. नंतर तुम्ही अर्ज करत असाल तर पुन्हा पेमेंट लागणार नाही. तुमचा डायरेक्टली अर्ज जतन होईल.
आता हे अर्ज आपला झालेला आहे. अर्ज झाल्यानंतर “घटक इतिहास पहा” वरती क्लिक करायच आहे. आणि “लागू केलेले घटक” हा पर्यायावर पहिला दिसतोय, त्यावरती क्लिक करून तुम्ही अर्ज केलेला इथे पाहू शकता. कोणकोणते अर्ज केलेले आहेत ते “लागू केलेले घटक” मध्ये दिसतील.
आणि इथे तुम्हाला कोणत्या योजनेसाठी केलेले ते सुद्धा दाखवेल. याची पावती पाहायची आहे – पावती डाऊनलोड करून इथे पावती डाऊनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज करायचा आहे.