Bandhkam Kamgar Pension Yojana महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. 19 जून 2025 रोजी शासनाने एक अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध केला असून, या निर्णयानुसार नोंदणीकृत बांधकाम कामगारांना निवृत्तीनंतर दरवर्षी पेन्शन स्वरूपात आर्थिक मदत दिली जाणार आहे. हे निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन 60 वर्ष पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांसाठी लागू असेल.
कोणत्याही बांधकाम कामगाराने जर सतत 10 वर्षे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करून काम केले असेल आणि तो कामगार सध्या 60 वर्षांचा झाला असेल, तर तो या योजनेसाठी पात्र ठरेल. शासन निर्णयात असे स्पष्ट करण्यात आले आहे की, संबंधित कामगाराच्या नोंदणीच्या कालावधीनुसार त्याला पेन्शनची रक्कम ठरवून देण्यात येणार आहे. उदाहरणार्थ, जर कामगाराची नोंदणी 10 वर्षांची असेल तर त्याला दरवर्षी सहा हजार रुपये पेन्शन मिळेल. जर ही नोंदणी 15 वर्षांची असेल, तर नौ हजार रुपये आणि जर 20 वर्षे किंवा अधिक काळासाठी नोंदणी असेल तर दरवर्षी बारा हजार रुपये पेन्शन कामगाराला मिळणार आहे.Bandhkam Kamgar Pension Yojana
या योजनेसाठी अर्ज महाबीओसीडब्ल्यूच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. तसेच अर्जाचा नमुना संबंधित जिल्ह्यातील कामगार सुविधा केंद्रातसुद्धा मिळू शकतो. अर्ज भरताना कामगाराचे नाव, वय, नोंदणी क्रमांक, जिल्हा, बँक खाते यासारखी सर्व माहिती स्पष्टपणे भरावी लागेल. अर्जासोबत काही आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. त्यामध्ये आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत, बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र आणि शिफारस प्रमाणपत्र समाविष्ट आहेत.
भरलेला अर्ज आणि त्यासोबतची कागदपत्रे स्थानिक WFC कार्यालयात जमा करायची आहेत. अर्जाची छाननी केल्यानंतर जर अर्ज मान्य झाला, तर त्या कामगाराच्या बँक खात्यात प्रत्येक महिन्याच्या दहाव्या तारखेपर्यंत थेट DBT (Direct Benefit Transfer) पद्धतीने रक्कम जमा केली जाईल. या योजनेचा लाभ फक्त त्या कामगारांना दिला जाईल जे अन्य कोणत्याही सरकारी पेन्शन योजना जसे की EPFO, PF किंवा कर्मचारी राज्य विमा योजनांचा लाभ घेत नाहीत.
जर कामगाराचा पती किंवा पत्नी देखील नोंदणीकृत बांधकाम कामगार असेल आणि त्यांनी 10 वर्षे काम केले असेल, तर दोघांनाही स्वतंत्रपणे पेन्शनचा लाभ मिळू शकतो. मात्र, पती किंवा पत्नीपैकी एकालाच पेन्शन लाभ मिळत असेल, तर दुसऱ्याला दुसऱ्यांदा ते मिळणार नाही.Bandhkam Kamgar Pension Yojana
Bandhkam Kamgar Pension Yojana ही योजना महाराष्ट्रातील हजारो बांधकाम कामगारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामध्ये आर्थिक आधार तर मिळतोच, पण वृद्धापकाळातही सामाजिक सुरक्षा मिळवण्याची संधीही मिळते. सर्व पात्र बांधकाम कामगारांनी याचा लाभ घ्यावा आणि गरजूंना ही माहिती नक्की शेअर करावी.