खरीप हंगाम 2025 मध्ये राज्याच्या विविध भागांमध्ये पूर परस्थिती अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झालेले राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय भयानक आहे आणि असे अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त झालेल्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे ती म्हणजे शासनाच्या नुकसानभरपाईचे अशा प्रकारे नुकसान ग्रस्त झालेल्या तब्बल 17 जिल्ह्यातील 11 लाख 24 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 774 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच संदर्भातील आणि अतिवृष्टीचा संदर्भातील महत्वाची माहिती लेखच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत
राज्यातील सर्वच भागांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शासनाच्या माध्यमातून ही नुकसान 30 जिल्ह्यामध्ये असल्याचे सांगण्यात आलेले मका असेल मूग उडीद असेल ज्वारी असेल बाजरी असेल सोयाबीन असेल कापुस असेल अशा विविध प्रकारच्या नुकसान झालेले 42 लाख हेक्टर पेक्षा क्षेत्र बाधित असल्याचे आकडेवारी समोर आलेले आणि आणखी नुकसान होते आणि आणखीन ही पाऊस सुरू आहे आणि याच यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आत्तापर्यंत जे काही नुकसान झालेले त्याचे जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये झालेल्या नुकसान आहे
याची काही भागांमध्ये पंचनामे पूर्ण करण्यात आले होते आणि असेच पंचनामे पूर्ण झालेले पहिल्या टप्प्यामध्ये जे काही शेतकरी आहेत या पात्र झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 12 सप्टेंबर 17 सप्टेंबर आणि 18 अशा वेगवेगळ्या तारखांना आलेल्या प्रस्तावानुसार मदत मंजूर करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि हेच मदत आता शेतकऱ्यांना केवायसी करून वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाईल याच्यामध्ये आपण पाहिलं तर सर्वात मोठा आणि सर्वात जास्त बाधित झालेला जो जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये आपण पाहिले होते की सात लाखापेक्षा जास्त हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आली होती त्यामध्ये 6 लाख 48 हजार 533 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे आकडेवारी समोर याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील सात लाख 74 हजार 313 शेतकऱ्यांसाठी 553 कोटी 48 लाख 62 हजार रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले आहे याचबरोबर 18 सप्टेंबर 2025 रोजी परभणी सातारा आणि सांगली या जिल्ह्यातील बाधित असलेल्या शेतकऱ्यांचे त्यांचे पंचनामे होऊन प्रस्ताव आलेले आहेत
अशा शेतकऱ्यांसाठी मदत वितरित करण्यासाठी एक मंजुरी दिलेले ज्याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जून जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्यातील दोन लाख 38 हजार 530 शेतकऱ्यांसाठी 128 कोटी 55 लाख 38 हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केलेल्या सातारा जिल्ह्यातील 142 शेतकरी आणि सांगली जिल्ह्यातील 13 हजार 475 शेतकरी यांना मिळून 7 कोटी 48 लाख 61 हजार रुपयांचे नुकसान भरपाई 18 सप्टेंबर 2025 मंजूर करण्यात आलेले 2025 याचबरोबर जून जुलै 2025 धाराशिव सांगली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये किती नुकसान झाले होते आणि त्याचा पंचनामा पूर्ण झाले होते आणि त्यांच्या साठी सुद्धा शासनाच्या माध्यमातून 88 लाख 96 हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केलेले आहे ज्यांच्यामध्ये जून 2025 धाराशिव जिल्ह्यातील 266 22 लाख आणि सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील जून 2025 साठी 161 शेतकऱ्यांना साधारणपणे सात लाख रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे या प्रमाणात जुलै 2025 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित असलेल्या 868 शेतकऱ्यांसाठी 59 लाख 94 हजार रुपयाचे नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे बरोबर अमरावती विभागामध्ये सुद्धा जून 2025 शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होता
आणि याच्यासाठी अमरावती विभागातील अकोला बुलढाणा वाशीम 3 जिल्ह्यातील दहा हजार 460 शेतकऱ्यांना दहा कोटी 52 लाख रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 8,397 शेतकऱ्यांचा समावेश आहे याचबरोबर नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जून ते ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 12 सप्टेंबर रोजी नुकसान भरपाई करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती त्याच्यामध्ये नागपूर विभागातील नागपूर-वर्धा आणि चंद्रपूर या तिन्ही जिल्ह्यात 24 हजार 841 शेतकऱ्यांना 13 कोटी 56 लाख 59 हजार रुपये एवढे नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे हिंगोली जिल्हामध्ये बाधित झालेल्या 395 शेतकरी यांच्यासाठी 18 लाख 28 हजार रुपयाचे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले होते तर सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑगस्ट 2025 मध्ये बाधित झालेले शेतकरी आहे
प्रस्ताव पाठवण्यात आला होता आणि आशा 59 हजार 110 शेतकऱ्यांना 59 कोटी 79 लाख 17 हजार रुपयाचे नुकसान भरपाईही 12 सप्टेंबर 2025 रोजी मंजूर करण्यात आलेले जून 2025 अवकाळी पाऊस अतिवृष्टी मुळे बाधित झालेला कोकण विभागातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यामधील 875 शेतकऱ्यांना 37 लाख 40 हजार रुपयांचे नुकसान भरपाई 12 सप्टेंबर रोजी मंजूर करण्यात आलेली आहे हे जे काही प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे हे जे काही नुकसान मंजूर करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यामध्ये पंचनामे पूर्ण करण्यात आलेले याची भरपाई आहे धाराशिव मध्ये जून महिन्यामध्ये नुकसान झाल्यावर त्याचे पंचनामे करून ती नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले त्यानंतर जुलै ऑगस्ट आणि आता सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात झालेला पाऊस याच्या आणखीन पंचनामे सुरू आहे याच्यासाठी सुद्धा 200 कोटीचा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गरजेचे असू शकते
सांगली त्याप्रमाणे कोल्हापूर त्याचप्रमाणे सातारा विदर्भामध्ये पाहिले तर तशी परिस्थिती अमरावती विभागातील पूर्णच्या पूर्ण 5 जिल्हे बाधित आहे याच्यासाठी सुद्धा आणखी मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मंजूर होऊ शकते तिकडे नाशिक विभागामध्ये तीच परिस्थिती आहे परत छत्रपती संभाजी नगर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये तीच परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये आता फक्त नांदेड जिल्ह्यातील नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेले पुणे विभागात असेल अहिल्या नगर जिल्ह्यामध्ये पाऊस झालेल्या आहे बीडमध्ये आणखी नुकसान भरपाई पंचनामे सुरू आहे आशा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे आणखीन पंचनामे सुरू आहे येथे आकडेवारी वाढतच चाललेली त्याच्या पंचनामे पूर्ण झाले अशा या 17 जिल्ह्यांमध्ल अकरा लाख 24 हजार शेतकऱ्यांना 774 नुकसान भरपाई मंजूर करण्यात आले आत्तापर्यंत जी आकडेवारी हाती आलेल्या आकडेवारीनुसार आणखीन चार हजार कोटी रुपयांच्या आसपास रक्कम ही या नुकसानभरपाईसाठी वितरित करावी लागू शकते अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे प्रत्येक भागांमध्ये लाख दोन लाख शेतकरी बाधित आहे आणि संपूर्ण आकडेवारी हाती आल्यानंतर संपूर्ण पंचनामे संपूर्ण जीआर च्या माध्यमातून निधी विकाराला मंजुरी देण्यात आल्यानंतर एकंदरीत किती नुकसान भरपाई दिली जाते ज्या ठिकाणी समजणारे आहे