नमो शेतकरी योजना एप्रिल जुलाई 2025 अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचे अनुदान वितरित करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे कृषी विभागाने यंदा या संदर्भात शासन निर्णय काढला आहे लवकरच लाभार्थ्याच्या खात्यात थेट dbt मार्फत जमा होईल अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली

राज्यातील तब्बल 92 लाख 36 हजार शेतकऱ्यांना आता सातव्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे याच्यासाठी 1,932.72 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत पात्र शेतकर्‍यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात त्यातच राज्य शासनाने प्रति वर्ष आणखीन 4 हजार रुपये अनुदानाची तरतूद करून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे

या योजनेच्या लाभार्थ्यांना लाभातून शेतकऱ्यांना दरवर्षी 12 हजार रुपये अनुदान मिळते या योजनेअंतर्गत आतापर्यंत 6 हप्ते वितरित करण्यात आले आता सातव्या हत्या अंतर्गत एप्रिल 2025 ते जुलै 2025 या कालावधीचे अनुदान शेतकऱ्यांना खात्यात जमा होणार आहे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना सामील असलेल्या सर्व लाभार्थी शेतकरी राज्यांच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत

Leave a Comment