भजनी मंडळ यांना 25 रुपये अनुदान राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय 1800 भजनी मंडळ यांना निधी मंजूर

Bhajani Mandal anudan GR update 2025 महाराष्ट्रातील लोक कलावंतांसाठी आणि ग्रामसंस्कृती जपणाऱ्या भजनी मंडळा करिता एक अत्यंत समाधानकारक आणि दिलासादायक अपडेट समोर आले आहे राज्य शासनाने भजनी मंडळांना दिल्या जाणाऱ्या 25 हजार रुपयांच्या एकरकमी भांडवली अनुदानासाठी मोठी निर्णय घेतला असून या अंतर्गत पात्र 1800 भजनी मंडळांना आणि वितरणास मंजुरी देण्यात आली आहे

अनुदानासाठी साडी 4 कोटी रुपयाच्या निधीला अंतिम मान्यता

24 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित केला या जीआर अंतर्गत एकूण साडे चार कोटी रुपयांचा निधी भजनी मंडळांसाठी मंजूर केला गेला आहे प्रत्येक मंडळाला 25 हजार रुपये याप्रमाणे पहिल्या टप्प्यातील बजने मंडळांना हा निधी वितरीत केला जाणार आहे राज्यातील लोककलावंतांना आर्थिक बळ देण्यासाठी पारंपारिक वाद्यांचे जतन आणि नव्या साहित्याची खरेदी यासाठी हे अनुदान विशेष उपयुक्त ठरणार आहे

अनुदान योजनेची पार्श्वभूमी

25 ऑक्टोंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून भजनी मंडळांसाठी भांडवली अनुदान या योजना जाहीर केली होती यामध्ये प्रत्येक पात्र भजनी मंडळाला 25 हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला गेला होता यानुसार 25 ऑक्टोंबर 2025 रोजी जीआर निर्गमीत झाला अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली अर्ज करण्याची अंतिम तारीख होती 6 सप्टेंबर 2025 राज्यभरातून हजारो भजनी मंडळांनी अर्ज दाखल केले प्राप्त अर्जाची पडताळणी व छाननी 1800 भजनी मंडळ ठरली आता या पात्र मंडळासाठी आर्थिक अंतिम निधी मंजूर करून वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे

कोणत्या साहित्य करता मिळणार अनुदान

भजनी मंडळाच्या कार्याला गती देण्यासाठी आणि पारंपारिक वाद्य साहित्याची उपलब्धता वाढण्यासाठी हे अनुदान देण्यात येत आहे यामध्ये संगीत वाद्य आणि साहित्याची खरेदी करता येणार आहे

  • हार्मोनियम
  • मृदंग
  • विना
  • पखवाज
  • तांबोरा
  • एकतारी
  • टाळ
  • भजनी साहित्य
  • अन्य अनुषंगिक सामग्री

यामुळे ग्रामीण भागातील अनेक भजनी मंडळांना नवीन साहित्य खरेदी करून आपली कला अधिक प्रभावीपणे सादर करता येणार आहे

भांडवली अनुदान योजनेचा उद्देश

या योजनेचे प्रमुख उद्देश पुढीलप्रमाणे आहे महाराष्ट्रातील पारंपरिक लोककलेचा प्रोत्साहन देणे भजनी मंडळ यांना आवश्यक संगीत वाद्याची उपलब्ध करणे गावातील धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम अधिक प्रभावी बनवणे लोककला व त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांना स्थिरता प्राप्त करून देणे ही योजना प्रत्यक्षात लोक प्रति राज्य शासनाची बांधलीकी अधिक बळकट करते

फायदा मिळणारी 1800 भजनी मंडळी

या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या अनेक मंडळापैकी शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार 1800 भजनी मंडळाचे निवड करण्यात आल्या आता या मंडळांना 25 हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे शासनाने आर्थिक मंजुरी दिल्यानंतर पुढील काही दिवसात येईल अनुदान थेट भजनी मंडळाच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल अर्ज प्रक्रिया यापूर्वी जाहीर आता वितरणाची वेळ भजनी मंडळांनी यापूर्वी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती पात्रतेचे निकष आवश्यक कागदपत्रे आणि इतर तपशील शासनाने स्पष्ट केली होती आता तपासणी पुढे पूर्ण झाल्यानंतर अनुदान वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे

भजनी मंडळासाठी मोठा दिलासा

शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील शेकडो लोककलावंत कलाकारांनी भजनी मंडळाच्या सदस्यांनी आनंदाचे वातावरण आहे अनेक मंडळी आपल्या जुन्या झालेल्या वाद्याची दुरुस्ती किंवा नवीन साहित्याची खरेदी या अनुदानात करू शकतील ग्रामीण भागातील संस्कृती पारंपारिक परंपरा टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे

निष्कर्ष : राज्यातील बजने मंडळांना 25 हजार रुपये भांडवली अनुदान वितरणाची प्रक्रिया आता सुरू होणार आहे 24 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित जीआर नुसार पहिल्या टप्प्यात एकूण अठराशे भजनी मंडळांना साडे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे ही योजना लोक कलावंतांसाठी एक मोठा दिलासा असून पारंपारिक भजने संस्कृतीला नवचैतन्य देणारी ठरणार आहे

Leave a Comment