Galyukt Shivar : शेतकऱ्यांचे थकीत अनुदान मंजूर गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार – जीआर जाहीर

राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या महत्वकांक्षी योजना 2024 मध्ये ज्यांनी आपल्या शेतात गाळ टाकला होता त्या शेतकऱ्यांना आणि संस्थांना अखेर शासनाच्या थकीत अनुदानाची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे 16 ऑक्टोबर 2025 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार जीआर या योजनेंतर्गत एकूण 118 कोटी 31 लाख 2 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे हा निधी राज्यातील विविध जिल्ह्यातील शेतकरी संस्था आणि ग्रामपंचायत दिली जाणार आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना म्हणजे काय ही योजना राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी शाश्वत योजना आहे धरणातील गाळ काढून तो शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते पाण्याचा साठा वाढतो शेतीची उत्पादकता सुधारते आणि धरणाचे आयुष्य वाढते यामुळे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना केवळ पर्यावरण पूर्वक नाही तर शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीत सुधार करणारी योजना ठरली आहे

118 कोटी च्या निधीला मंजुरी

राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी एकूण 118 कोटी 31 लाख 2016 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे यापैकी शासकीय संस्थांना 84 कोटी 79 लाख रुपये वैयक्तिक शेतक-यांना 33 कोटी 51 लाख रुपये हा निधी संबंधित जिल्हा परिषद संस्था आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे

कोणत्या जिल्ह्यांना मिळणार लाभ

या योजनेची अंमलबजावणी राज्यातील जवळपास 683 जलसाठा मधून करण्यात आलेली आहे विविध जिल्ह्यांमध्ये मंजूर निधी पुढील प्रमाणे आहे

पुणे जिल्हा : 143 जलसाठे शासकीय संस्थेच्या माध्यमातून गाळ टाकण्याचे काम पूर्ण

सातारा आणि सांगली : दोन प्रमुख संस्थामार्फत गाळ टाकण्यात आला असून संबंधित शेतकऱ्यांना अनुदान वितरित मंजुरी

कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गाळ टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे

बीड जिल्हा : यापूर्वीच सुमारे 18 कोटी निधी वितरित झाला होता आणि नव्या जीआर नुसार आणखी निधी मंजूर केला आहे

नांदेड जिल्ह्यात : सुमारे 4 कोटी 12 लाख रुपये इतका निधी मंजूर

शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

2024 मध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात गाळ टाकला होता पण काही कारणामुळे अनुदान थकीत होते शासनाच्या या निर्णयामुळे आता प्रत्यक्ष असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यांना ग्रामपंचायत त्यांना आणि वैयक्तिक अर्जदारांना लवकरच त्यांच्या खात्यात निधी जमा होणार आहे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की ही योजना कायमस्वरूपी राबवली जाणार असून दरवर्षी गाळ काढणे आणि शेतात टाकण्यासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाईल

हवामान आणि त्याची स्थिती

या वर्षी पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले धरणा मध्ये पाण्याचा साठा वाढल्याने कठीण ठरत आहे तरीही शासनाने सांगितले आहे की गाळ काढण्यासाठी उपाय शोधून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल योनीचे मुख्य हेतू धरण गाळमुक्त करणे आणि शेतीसाठी जमिनीची गुणवत्ता वाढणे या दिशेने काम सुरू आहे

योजनेची योजना अंमलबजावणी कशी होते

गाळ काढणे आणि शेतात टाखणे हे काम विविध प्रकारे राबविली जाते ग्रामपंचायतच्या माध्यमातून अशासकीय संस्था फाउंडेशनच्या माध्यमातून वैयक्तिक शेतकरी द्वारे थेट अर्ज संबंधित शेतकऱ्याची महाडीबीटी पोर्टल वरून अर्ज करून ही योजना निवडण्याची असते कागदपत्रे आधार कार्ड 7 /12 उतारा बँक खाते पासबुक आवश्यक असतात

पुढील अपडेट काय?

16 ऑक्टोंबर 2025 चा जीआर जारी झाल्यानंतर जिल्हा निहाय निधी वितरित सुरू झाले आहे जोडपत्रा मध्ये प्रत्येक जिल्ह्याचा तपशील दिलेला असून किती गाळ काढण्यात आला आहे आणि किती अनुदान मंजूर झाले त्याची माहिती उपलब्ध (GR) आहे शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय किंवा ग्रामपंचायत आपले नाव आहे का हे तपासावे

निष्कर्ष : गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना ही शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने सोपे चा अनिस जल संवर्धनचा मार्ग आहे राज्य शासनाने केलेल्या 118 कोटी चा निधी मंजुरीमुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ही योजना भविष्यातही सातत्याने राबवली गेल्यास महाराष्ट्रातील शेती अधिक समृद्ध आणि टिकाऊ होईल यात शंकाच नाही

Leave a Comment