अनेक देशांमधून वाढलेल्या आयातीच्या दाबामुळे कांदा मूग, तूर, कापूस आणि सोयाबीन यासारख्या प्रमुख कृषी मालाचे दर विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत द इकॉनोमिक टाईम्सच्या बातमीनुसार कांदा तूर आणि मुग गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी दरात विकले जात आहेत पिवळ्या वाटाण्याचे दर सहा वर्षाच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत तसेच महाराष्ट्र मधील प्रमुख बाजारपेठ मध्ये दर घसरल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे
नाशिक मधील लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दारावरची गेल्या तीन वर्षातील सर्वात कमी नोंद झाली आहे सोयाबीन आणि कापसाचे दरही गेल्या दोन वर्षाच्या आणि नीचाकी पातळीवर आले आहेत
ऑस्ट्रेलिया आफ्रिका म्यमणार ब्राझील आणि बांगलादेश सारख्या देशांनी भारतीय बाजारात कडधान्याचा पुरवठा वाढला आहे यामुळे देशात परत बाजारातील कडधान्याच्या किमतीवर अतिरिक्त दबाव आला आहे त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ यासारख्या सरकारी एजन्सींनी सणासुदीच्या काळात मागणी पूर्ण करण्यासाठी बाजारात कांद्याचा बंपर स्ट्रोक सोडल्यामुळे भावांमध्ये आणखीन घट झाली आहे
किमतीतील ही मोठी घसरण ग्राहकांसाठी निश्चितच फायद्याची आहे परंतु त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मात्र प्रचंड दबाव वाढला आहे तंत्रज्ञानाचे मत आहे की सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षितेसाठी आणि बाजार समितीचे राखण्यासाठी कृषी धोरणे अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे





