गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांची शेती पिकांचा फळबागांचा पशुधन यांचं प्रमाण सामान्य नागरिकांची घरे दुकाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्याच्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून पंचनामे पूर्ण करून या भागातील नागरिकांना शेतकरी मदत वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे राज्याच्या विविध भागांमध्ये अद्यापि अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे नुकसान होत आहे
आणि या ज्या ज्या भागांमध्ये नुकसान होत आहे अशा भागातील या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे 16 सप्टेंबर 2025 पर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 195 तालुका मधील 654 महसूल मंडळामध्ये खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले याच्या मध्ये 17 लाख 85 हजार 714 हेक्टर अर्थात 42 लाख 84 हजार 846 एकर एवढे क्षेत्र या ठिकाणी ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थिती बाधित दाखवण्यात आलेले आहे
यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन,मका, कापूस, तूर,मूग,उडीद भाजीपाला याप्रमाणे फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी हळद अशा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेले आणि अशाप्रकारे बाधित झालेले एकूण 42 लाख 84 हजार 846 एकरचे पंचनामे शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आणि उर्वरित नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पंचनाम्याचे प्रक्रियादेखील सध्या सुरू आहे याच्या मध्ये सर्वाधिक बाधित झालेल्या जिल्ह्यामध्ये नांदेड 7 लाख 28 हजार हेक्टर वाशिम 2 लाख 20 हजार हेक्टर तर यवतमाळ 3 लाख 11 हजार हेक्टर तर एक लाख 57 हजार हेक्टर अकोला एक लाख 77 हजार हेक्टर तर सोलापूर 47 हजार हेक्टर बुलढाणा 89 हजार 782 अशाप्रकारे हे सर्वाधिक नुकसान ग्रस्त झालेले जिल्हे त्या आणि इतर काही जिल्हे बाधित होत आहेत
त्याचप्रमाणे अहिल्या नगर मध्ये धाराशिव मध्ये याप्रमाणे बीड जालना या हिंगोली वाशिम या भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे जळगाव धुळे या भागांमध्ये सुद्धा पंचनामे सध्या सुरू आहे आणि अशा प्रकारे जिथे पंचनामे सुरू आहेत असे पंचनामे सुरू झाल्यानंतर त्या त्या भागातील अतिवृष्टीग्रस्त बाधित शेतकरी असतील त्यांना या ठिकाणी नुकसानभरपाई दिले जाणारे बाधित झालेल्या जिल्ह्यामध्ये समावेश असलेले जिल्हे नांदेड वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्या नगर छत्रपती संभाजी नगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्ना चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे अशा जिल्ह्यांचा याच्या मध्ये समावेश आहे
आणि लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण करून राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई चा जीआर निर्गमित केला जाईल आणि याच्या माध्यमातून बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पशुधनासाठी शेती पिकांसाठी जमिनीसाठी याप्रमाणे पडझड झालेल्या घरांसाठी मदतीचे वितरण केले जाईल त्याच्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल आणि याच संदर्भातील आहे याच्या संदर्भातील काही प्रक्रिया असतील तर अंतिम टप्प्या मध्ये सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे धन्यवाद