खरीप हंगाम 2025 : पेरणी क्षेत्रात तब्बल 26. 93 लाख हेक्‍टर ची वाढ

केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार आता खरीप हंगाम 2025 मध्ये आतापर्यंत एकूण पेरणी क्षेत्र आता 1,105. 42 लाख हेक्टर पोहोचले आहे गेल्या वर्षाच्या याच कालावधीतील 1078.49 लाख हेक्टरच्या तुलनेत वाढ झाली आहे 26.93 लाख वाढ झाली आहे कृषी तज्ञांच्या मते लागवडीच्या क्षेत्रात झालेली वाढ उत्पन्न वाढवेल ज्यामुळे केवळ शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढणार नाही तर अन्नधान्याच्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यात मदत होणार

धानाच्या लागवडीत सध्या सर्वाधिक वाढ झाली असून आतापर्यंत 438. 28 लाख हेक्टर पेक्षा धनाची पेरणी झाली आहे जी गेल्या वर्षाच्या तुलने मध्ये 19.63 लाख अधिक आहे सध्या त्याची पेरणी ही चांगली झाली आहे उडीद मूग यासारख्या प्रमुख डाळीचे क्षेत्र वाढवून 116. 40 लाख हेक्‍टर झाले आहेत

तर गेल्या वर्षीच्या 114. 46 लाख हेक्‍टर होते याशिवाय आता बाजरी ज्वारी आणि नाचणीचे यासारख्या भरड धान्याचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे गेल्या काही वर्षाच्या तुलनेत 12.09 ख हेक्टर वाढून 192.1 लाख हेक्‍टरवर पोचले आहे उसाची लागवड ही गेल्या वर्षापेक्षा 15 लाख हेक्टरने वाढून 57. 31 लाख हेक्‍टरपर्यंत झाली आहे

Leave a Comment