महाराष्ट्र सरकारचे (Ladki Bahin Yojana update) लाडकी बहीण योजना अनेक अर्थाने खूपच लोकप्रिय ठरली आहे आपल्याला माहिती आहे की या माध्यमातून लाभार्थी महिलेच्या खात्यात प्रतिमहिना 1500 रुपये देण्यात येते या योजनेसाठी सरकारच्या माध्यमातून काही अटी व शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत परंतु कालांतराने दिसून आले की बऱ्याच लाभार्थी या अटी शर्ती पूर्ण न करत असताना देखील
या योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे मध्यंतरी कालांतराने सरकारने या लाभार्थ्यांची पातळी करण्याचा निर्णय घेतला होता व त्यानुसार केलेल्या पातळीत विविध कारणांनी 26 लाख 34 हजार लाडक्या बहिणी (Ladki Bahin Yojana Eligbility) अपात्र ठरल्या त्या सगळ्या ठरलेल्या बहिणींचे मानधन सरकारच्या माध्यमातून रोखण्यात आलेले आहे इतकेच नाही तर आता या सर्व लाडक्या बहिणीच्या प्रकरणाची छाननीचे काम सुरू आहे
महिला व बाल विकास विभागाचे म्हणणे काय
या सगळ्या प्रकरणावर महिला व बाल विकास विभागाच्या सूत्राच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे की 26 लाख 34 हजार बहिणीचे सध्या रोखण्यात आले आहे व त्यांची (Ladki Bahin Yojana Payment Status) छाननी चे काम सध्या सुरू आहे जोपर्यंत छाननीचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हे मानधन रोखण्यात आलेले आहे याचा अर्थ असा आहे की या सर्व लाडक्या बहिणी कायमस्वरुपी अपात्र ठरलेल्या आहेत असे नाही त्यांनी छाननी केल्यानंतर त्यामध्ये पात्र ठरतील त्यांना नियमित हप्ता दिला जाणार आहे
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या
राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स वर पोस्ट करत म्हणाले की या योजनेच्या माध्यमातून लाभ घेत असलेल्या लाभार्थ्याला पैकी सुमारे 27 लाख 34 हजार लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत असल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली असून हे सर्व लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यातील आहे
त्यानुसार आता महिला व बालविकास विभागाने या लाभार्थ्यांची माहिती संबंधित जिल्हा यंत्रणांना छाननीसाठी उपलब्ध करून दिली आहे व त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात की नाही याबाबत छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे तसेच नंतर जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कारवाई केली जाईल व पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ पुढेही सूरू राहील अशी माहिती समोर आली आहे