हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस 86 हजार पेक्षा जास्त हेक्टर उध्वस्त

हिंगोली जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कृषी व महसूल विभागाने केलेल्या संरक्षित एकूण 86 हजार 404 हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाल्याचे समोर आले आहे यामध्ये सर्वाधिक फटका हिंगोली व कळमनुरी तालुक्यांना असून बसम तालुक्याच्या तुलनेत कमी नुकसान झाले आहे (पिक विमा वाटप)

जुलै अखेरपर्यंत जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होते त्यामुळे पिकांसाठी पाऊस योग्य असला तरी नाले, धरणे, तलाव व नद्या कोरड्या राहिल्या होत्या मात्र आता ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाने प्रमाण वाढले आणि दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने पुर परिस्थिती निर्माण झाली परिणामी सोयाबीन ज्वारी कापूस तूर मूग उडीद याचा विविध खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे

  • तालुकानिहाय नुकसानाचा आढावा हिंगोली जिल्ह्यातील 32 हजार 200 शेतकरी 27 हजार 047 क्षेत्र प्रभावित
  • काळमनुळी तालुका 31,360 शेतकरी 29,656 हेक्टर क्षेत्र प्रभावित
  • सेनगाव तालुका 14 हजार 800 शेतकरी 14 हजार 930 क्षेत्र प्रभावित
  • औंढा नागनाथ तालुका 7 हजार 900 शेतकरी 9218 हेक्‍टर क्षेत्र प्रभावित

जिल्हाधिकारी यांनी मंडळाधिकारी तलाठी ग्रामसेवक तसेच कृषी सहायकांना प्रत्यक्ष शेत पातळीवर जाऊन शेत पातळीवर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार असून त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया केली जाईल अशी माहिती प्रशासनाकडून येत आहे

Leave a Comment