महाराष्ट्रात सध्या जमिनीशी संबंधित प्रत्येक व्यवहारात सातबारा उताराला खूप महत्त्व आहेच मात्र जमीन विक्री खरेदी कर्ज किंवा वारसा यासाठी या कागदपत्रांवर नोंदी स्पष्ट असणे सर्वात गरजेचे आहे पण अनेकदा फेरफार करताना चुकीच्या किंवा खोट्या नोंदी होतात त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत येतात
चुकीची फेरफार नोंद म्हणजे काय ?
फेरफार नोंद म्हणजे जमिनीच्या मालकीत किंवा हक्का मध्ये झालेल्या बदलाची अधिकृत नोंद महसूल विभागातील तलाठी किंवा संबंधित अधिकारी करतात पण कधी कधी चुकून वेगवेगळ्या व्यक्तीचं नाव नोंदवला जात मृत व्यक्तीच्या नावे हक्क राहतो किंवा अधिकृत वारसाचे नाव टाकलं जातं अशा चुका झाल्या तर शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही विक्री खरेदीचे व्यवहार थांबतात आणि जमिनीवरील हक्क धोक्यात येऊ शकतो
कायद्याची कर्तुत काय सांगते
कलम 150 : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 महसूल अधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अर्ज करून चुकीची नोंद दुरुस्ती करता येते अर्जासोबत खरी मालकी दाखवा सारे पुरावे द्यावे लागतात अधिकारी हाताळणी करून चुकीची नोंद रद्द करू शकतात किंवा दुरुस्ती करू शकतात
कलम 251 : जर कोणी खोटी माहिती देऊन जमिनीवर हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो
अपील करण्याची मुदत किती
साधारणता फेरफार नोंदणी वर अपील करण्यासाठी 7 ते 90 दिवसांची मुदत असते पण अनेक वेळा शेतकऱ्यांना ही चूक लक्षात येते मग मुदत संपली असेल तरी संबंधित महसूल अधिकाऱ्याकडे विशेष कारण दाखवून अर्ज करता येतो अधिक कारण योग्य असल्यास जुन्या नोंदीचे पुनरलोकन करू शकतात मात्र यासाठी ठोस पुरावे आवश्यक असतात
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे
कायतज्ज्ञ सांगतात की चुकीची नोंद तत्काळ कायम राहीली तर ती रद्द करणे कठीण होऊ शकते म्हणून शेतकऱ्यांनी सातबारा उतारा वेळोवेळी तपासावा आणि जर चूक दिसली तर तात्काळ कारवाई करावी सातबारा उतारा ची चुकीचे फेरफार नोंद शेतकऱ्यांच्या हक्कावर मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे वेळ न घालवता पुरावे गोळा करून महसूल अधिकाऱ्याकडे किंवा न्यायालयात दाद मागणार आवश्यक आहे योग्य वेळी कारवाई आपला जमिनीवरील हक्क सुरक्षित ठेवू शकते