मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्यशासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टर अनुदान योजना अर्थात राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजना ही योजना 2025-26 मध्ये राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि यासाठी 400 कोटी रुपयांच्या निधीला देखील प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.
मित्रांनो यासंदर्भातील एक महत्त्वाचा असा जीआर आज 23 मे 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. ज्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कृषी यंत्रीकरणाच्या माध्यमातून ट्रॅक्टरसाठी अनुदान मिळणार आहे.
मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून कृषी यंत्रीकरण ही योजना राबवली जाते. परंतु या योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर वगळता इतर सर्व अवजारांसाठी अनुदान दिले जाते, त्यासाठीचे लक्षांक दिले जातात. परंतु राज्यामध्ये लाभार्थ्यांची मोठी संख्या, मोठी मागणी आणि यामध्ये ट्रॅक्टर या अनुदानाची बाब नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना या बाबीपासून वंचित राहावं लागतं आणि यासाठीच राज्य शासनाच्या माध्यमातून राज्य पुरस्कृत कृषीकरण ही योजना राबवली जाते.
मित्रांनो याच योजनेसाठी 2025-26 करता 400 कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे आणि या 400 कोटी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून राज्यामध्ये राज्य पुरस्कृत कृषीकरण ही योजना राबवली जाणार आहे.
मित्रांनो 12 सप्टेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार ही योजना राज्यामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. अटी शर्ती या 12 सप्टेंबर 2018 च्या जीआर नुसारच असतील, ज्याबद्दल आपण यापूर्वीच सविस्तर माहिती घेतलेली आहे.
या योजनेच्या अंतर्गत आता लाभार्थ्यांना ज्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला लाभार्थी, सर्व प्रवर्गातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी यांना किमतीच्या 50% किंवा सव्वा लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान दिले जाणार आहे.
याचबरोबर इतर प्रवर्गातील जे बहुभूधारक शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना 40% किंवा 1 लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे.
अर्थात राज्यामध्ये ट्रॅक्टर अनुदान योजनेच्या अंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सव्वा लाख रुपयांपर्यंत अनुदान दिलं जाणार आहे.
मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टरसाठी पाव लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु केंद्र शासनाच्या अंतर्गत कुठलीही योजना राबवली जात नसल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून या सव्वा लाख रुपयांच्या अनुदानाच्या माध्यमातूनच आता ही राज्य पुरस्कृत कृषीयंत्रीकरण ही योजना राबवली जाणार आहे.
महाडीबीटीच्या माध्यमातून अर्ज भरवून घेतले जातील आणि याच्या अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना या महाडीबीटीच्या प्रणालीद्वारे या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. अनुदान दिलं जात असताना डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केलं जाईल अशा प्रकारच्या सूचना देखील या जीआरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत.
मित्रांनो अशाप्रकारे आता राज्यामध्ये ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी ही कृषी यांत्रीकरण राज्य पुरस्कृत कृषीकरण योजना राबवायला मंजुरी दिलेली आहे.
मित्रांनो हा महत्त्वपूर्ण असा जीआर आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता.