मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे आणि यामध्ये जाता हा अवकाळी पाऊस आणखीन उग्ररूप आणखीन जोरदार पडण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत. याच्या संदर्भातील काही महत्त्वाचे अपडेट मान्सूनच्या वाटचालीच्या संदर्भातील काही महत्त्वाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
havaman andaj maharashtra : मित्रांनो, एकंदरीत 2025 मध्ये मान्सून समाधानकारक राहील. सरासरीपेक्षा जास्त पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. परंतु यामध्ये जूनमध्ये काहीसा कमी पाऊस राहील किंवा जूनमध्ये पाऊस शेतकऱ्यांना सतावेल अशा प्रकारच्या अपडेट देण्यात आलेल्या होत्या आणि तशाच प्रकारच्या काही हालचाली आता वातावरणामध्ये दिसून येत आहेत.
मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर उत्तर प्रदेशमध्ये एक सायक्लोनिक सिस्टम तयार झाले आहे. याचबरोबर पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीलगत देखील एक सायक्लोनिक सिस्टम तयार होत आहे. याचबरोबर आपण जर पाहिलं तर कोकण किनारपट्टी आणि कर्नाटकच्या लगतचा अरबी समुद्र आहे, यामध्ये देखील एक लो प्रेशर एरिया बनलेला आहे. तो देखील सायक्लोनिक सिस्टममध्ये आता थोडासा परावर्तित होतोय.
याचबरोबर जर आपण पाहिलं तर एक सायक्लोनिक सिस्टम हे मध्यप्रदेशावर सुद्धा अॅक्टिव आहे आणि त्याची ट्रफ ही रॉयल सीमापर्यंत आहे. त्यामुळे जवळजवळ चार ते पाच वेदर सिस्टम सध्या अॅक्टिवेट आहेत आणि या सर्वांचा परिणाम हा मान्सूनवर आणि अवकाळी पावसावर होताना दिसत आहे.
मित्रांनो, या परिणामामुळे आपण पाहिलं होतं की नाशिक किंवा लगतच्या भागामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होतोय. बीडमध्ये, अहिल्यानगरमध्ये, धाराशीव, सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. आणि आता या पावसामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत.
मित्रांनो, आज 19 मे पासून ते साधारणपणे 25 ते 26 मे पर्यंत राज्यामध्ये सर्वत्र जोरदार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. यामध्ये आपण जर पाहिलं तर शिर्डी, मालेगाव, अहिल्यानगर, बीडचा आष्टी, जामखेड, श्रीगोंद्याचा काही भाग, पुणे, सातारा, सांगलीच्या काही भागांमध्ये जोरदार ढगफुटी सरदृश्य पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत.
राज्याच्या इतर भागांमध्ये सुद्धा वादळ वारा किंवा विजेचा कडकडाट आणि त्यासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे.
मित्रांनो, आता मान्सूनची वाटचाल सुरू आहे. येण्याचे जे काही दिवस आहेत ते वेळापत्रकाच्या पूर्वी आहेत. अंदमानमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि त्याची पुढची वाटचाल सुद्धा हवामान पोषक आहे. सध्या जे काही प्री-मान्सून अॅक्टिविटी होतात त्या आता जोर धरू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे मान्सूनची पुढील वाटचाल सुद्धा सुकर होणार आहे. मान्सून नियोजित वेळेपेक्षा एक ते दोन दिवस आधी येऊ शकतो अशा शक्यता निर्माण झालेल्या आहेत.
मित्रांनो, 2023 मध्ये सुद्धा अरबी समुद्रावर बनलेलं सायक्लोनिक सिस्टम होतं त्याने पावसाचा पूर्ण रुग गुजरात आणि राजस्थानकडे वळवला होता. आता सुद्धा येत्या दोन-तीन दिवसांमध्ये जे काही सायक्लोनिक सिस्टम आहे, ते जोरदार पाऊस गुजरातला घेऊन जाणार आहे. याचा परिणाम या येणाऱ्या मान्सूनवर सुद्धा काही प्रमाणात दिसून येऊ शकतो.
त्यामुळे जरी आत्ता चांगला पाऊस झाला, मान्सून वेळेवर किंवा त्या वेळेच्या आधी आला तरी जूनचे काही दिवस हे शेतकऱ्यांसाठी अतिशय जाचक ठरू शकतात. कारण महाराष्ट्रामध्ये नॉर्मली पेरण्या झाल्यानंतर आवश्यक असलेला पाऊस आणि त्यामधील खंड या सध्याच्या सायक्लोनिक सिस्टममुळे पडू शकतो, अशा शक्यता सुद्धा दिसून येतात.
परंतु तत्पूर्वी आत्ताचे जे काही चार ते पाच दिवस आहेत, हे मात्र प्रत्येक ठिकाणी पाण्याची उपलब्धता करून देणाऱ्या पावसाचे असणार आहेत आणि तशा प्रकारचा पाऊस आता आपल्याला पडताना सुद्धा दिसत आहे.