Pm Kisan योजना : पुढील हप्ता कधी पर्यंत मिळू शकतो पुढील अंदाज जाणून घ्या

21St Installment update : केंद्र सरकार कडून देशामधील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना चालवल्या जात आहेत याच योजने पैकी एक महत्त्वाची योजना म्हणजेच पीएम किसान सम्मान निधि योजना आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करते आहे ही रक्कम थेट प्रत्येकी 2 हजार रुपयाच्या तीन हप्त्या मध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते आतापर्यंत या योजनेचे 20 हप्ते जारी करण्यात आली असून कोट्यावधी शेतकरी 21 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत

दिवाळीपूर्वी हप्ता येईल का ?

आगामी काळात मध्ये अनेक सण उत्सव येत आहेत तसेच त्या पाठोपाठ दिवाळीच्या सन जवळपास आला आहे त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना आशा आहे की दिवाळीच्या तोंडावर सरकार 21वा हप्ता जारी करेल मात्र याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जारी केलेली नाही गेल्या वर्षाच्या नियमानुसार किंवा रेकॉर्ड नुसार पीएम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्याच्या अंतराने पाठवला जातो सरकारने नुकताच 20वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी जारी केला होता त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर किंवा दिवाळीच्य आधीच्या शेतकऱ्यांच्या खात्यात 21वा हप्ता जमा होण्याची शक्यता खूप कमी आहे

21 वा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो

सध्याच्या अंदाजानुसार पीएम किसान सन्मान निधी चा 21वा हप्ता सरकारकडून डिसेंबर महिन्याच्या आसपास जारी केला जाऊ शकतो मात्र या तारखेची अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहिती ची वाट पाहावी योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा एक महत्त्वाचा स्त्रोत बनले आहे त्यामुळे सरकारी 21वा हप्ता कधी जारी करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

तुम्हाला वेळोवेळी महत्त्वाची माहिती हवी असेल तर आमच्या व्हाट्सअप चैनल आणि टेलिग्राम वर नक्की जॉईन करा

Leave a Comment